मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, सकाळी-सकाळी नागरिकांची धावाधाव

Earthquake shocks in Marathwada, morning-morning rush of citizens

 

 

 

 

आज गुरूवारची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय खळबळजनक ठरली. हिंगोली जिल्ह्यासह अनेक ठिकाणी गुरूवारी

 

 

 

सकाळी-सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीमध्ये गुरूवारी सकाळी एकामागोमाग एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले.

 

 

१० मिनिटांच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरीक घाबरले. भूकंपाचा पहिला झटका 6 वाजून 8 मिनिटांनी जाणवला. 4.5 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती.

 

 

 

तर भूकंपाचा दुसरा झटका दहा मिनिटांनी 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती.

 

 

 

हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

 

 

गुरूवारी सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली ,तसेच वसमत सह इतर ठिकाणी ,वेगवेगळ्या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले.

 

 

 

 

 

जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 

 

 

 

२१ मार्च रोजी सकाळी सहा वाजून ९ मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली.

 

 

 

 

हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले.

 

 

याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी सहा वाजून १९ मिनिटांनी लगेचच दुसरा हलका धक्का जाणवला.

 

 

 

 

३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. मात्र, या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर

 

 

 

 

दक्षिणेला असलेल्या कुरुंदा आणि दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

 

 

 

 

हिंगोलीमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का 6 वाजून 8 मिनिटांनी तर भूकंपाचा दुसरा झटका 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला.

 

 

 

 

या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली.

 

 

 

 

सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान झालेल्या भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा पडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.

 

 

 

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ६ वाजून ९ मिनिटांदरम्यान भूकंपाचे दोन धक्के जाणवले.

 

 

 

भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत होउन घरा बाहेर पडले होते. नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव, मुखेडसह

 

 

 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्के जाणवले. काही गावात भिंतीना तडे गेले. मार्चच्या पहिल्या आठवड्यातही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 

 

 

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटर असून या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

 

 

 

या धक्क्यामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसान झालेलं नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

छवि

 

 

 

नांदेड शहरासह ग्रामीण भागात आज पहाटे भूकंपाचा धक्का जाणवला. घरातील वस्तू हादरल्या असून धनेगाव परिसरातील काही भागात टेकड्यांवर असलेल्या पत्र्यांच्या घरावरील मोठे दगड सरकले आहेत.

 

 

 

 

तसेच, बरेचजण फिरण्यासाठी बाहेर पडल्यामुळे त्यांना भूकंपाचा धक्का जाणवला नाही. मालेगाव रोडवरील प्रेम नगर, दीपनगर, श्रीनगर, वजिराबाद, सिडको, हडको

 

 

 

 

भागातील व अनेक परिसरात भूकंप धक्का जाणवला. शिवाय अर्धापूर , भोकर , हदगाव , नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्के जाणवले.

 

 

काही गावात भिंतीना तडे गेल्याची माहिती आहे. अनेकांनी एकमेकांशी साधला संपर्क. सर्वजण घराबाहेर आले होते. काही काळ नागरिकांध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यापूर्वीही नांदेड शहरात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 

 

 

 

भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर मोजली जाते. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे,

 

 

 

त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजे केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.

 

 

 

 

तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले, तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा, टेबलचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा.

 

 

 

किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास तात्काळ घरातून, इमारतीमधून बाहेर पडा आणि मोकळ्या जागी जाण्याचा प्रयत्न करा

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *