मनोज जरांगे सभेत बोलता -बोलता खाली बसले आणि….

Manoj Jarange sat down while talking in the meeting and... ​

 

 

 

 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौरा करत आहेत.

 

 

 

काल (सोमवारी) धाराशिव येथे जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. त्यावेळी अचानक ते खाली बसले त्यामुळे गोंधळ उडाला. सततचा प्रवास, जाहीर सभा, दौरा

 

 

यामुळे थकवा आल्याने जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी बोलताना नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

प्रकृती ठिक नसली तरी, नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे.

 

 

स्वतःच्या लेकरांसाठी मराठा समाज एकत्र आला आला. एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतंय का? असा प्रश्न देखील यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

ज्या समाजाला माय बाप मानलं त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं की, त्यांनी मला लेकरू मानलं आहे. आरक्षणासाठी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. एक जीव जाईल पण, 6 कोटी जीव वाचतील. लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

 

 

 

मला समाजाचं प्रेम मिळालं, माझ्या वाट्याला हे भाग्य आलं आहे, त्यांच्यासाठी लढणं हे देखील माझं कर्तव्य आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. गरीब लेकरांनी आरक्षणासाठी मोठ्या वेदना सहन केल्या आहेत.

 

 

एका टक्क्यावरून चांगले पद गेलेली मराठी समाजाची लेकरं आहेत. आता तो न्यायाचा दिवस जवळ आला आहे असं जरांगेंनी म्हटलं आहे.

 

 

पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सरकारने ८ तारीख आरक्षणासाठी दिली होती, मात्र, पुढे त्यांना काय झालं माहिती नाही एका नेत्याचं ऐकून

 

 

त्यांच्या दबावाखाली सरकार येतं आहे की काय म्हणून आमच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत की काय? असं ही जरांगेंनी म्हटलं आहे.

 

 

दरम्यान मनोज जरांगे यांची सोमवारी बीडच्या अंबेजोगाईच्या सभेत प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे असतांना आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

 

 

 

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करतांना पाहायला मिळत आहे. त्यांच्या अनेक सभा पहाटेपर्यंत चालल्याचे देखील पाहायला मिळाले.

 

 

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी बसूनच भाषण केले.

 

 

 

पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी येथे देखील बसूनच भाषण केले. त्यानंतर त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना ताप असून, प्रचंड अशक्तपणा निर्माण झाला असल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी विश्रांती घेणं महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.

 

 

परंतु, मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

 

 

मनोज जरांगे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांची अंबेजोगाईमध्ये सभा पार पडली. तसेच, त्यांच्या आजच्या दौऱ्यानुसार केज तालुक्यातील बोरी सावरगावमध्ये दहा वाजता पहिली सभा होईल.

 

 

 

त्यानंतर एक वाजता धारूर आणि तीन वाजता माजलगावमध्ये सभा होईल. तसेच, त्यांच्या दौऱ्याचे समारोप माजलगावमधील जाहीर सभेने होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

 

 

मराठा आरक्षणाचा मुदा मार्गी लावण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितली असून, त्यांना मुदत देण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती.

 

 

दरम्यान, मुदत जवळ आली असतांना देखील जरांगे यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 17 डिसेंबरला आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे.

 

 

तर, या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनोज जरांगे यांच्यासह राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *