कुंभमेळ्याच्या अस्वच्छ पाण्यावरून राज ठाकरें आणि भाजपात जुंपली

Raj Thackeray and BJP clash over unclean water at Kumbh Mela

 

 

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पक्षातील विविध नेत्यांनी भाषणं केली.

 

तसंच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं. याकरता त्यांनी महाकुंभ मेळ्यात गेलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांचाही समाचार घेतला.

 

राज ठाकरे म्हणाले, “मुंबईला मेळावा बैठक लावली होती. काहीजण आजारी होते म्हणून आले नव्हते. त्यातील ५-६ जणांनी सांगितलं की कुंभला गेले होते.

 

मी म्हटलं गधड्यांनो करता कशाला पापं? मी हेही विचारलं की आल्यावर अंघोळ केलीत ना…? हे बाळा नांदगांवकर छोट्याश्या कमंडलूमधून गंगेचं पाणी घेऊन आले. मी हड म्हटलं, मी नाही घेणार.”

 

 

“पूर्वीच्या काळी ठीक होतं. पण आता मी सोशल मीडियावर पाहतोय, तिथे गेलेली माणसं, बाया त्या पाण्याने काखेत वगैरे घासतायत. आणि बाळा नांदगावकर येऊन म्हणत आहेत की हे घ्या गंगेचं पाणी! कोण पिएल ते पाणी?

 

आताच करोना गेलाय. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. मी कित्येक स्वीमिंग पूल पाहिलेत की उद्घाटनाच्या वेळी निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे होऊ लागले. कोण त्यात जाऊन पडेल?”, असा मिश्लिक संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.

 

“त्यांनी तिथे काहीतरी केलंय, ते मी इथे पितोय. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही. या देशात एकही नदी स्वच्छ नाहीय. आम्ही नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा पाहतो तिथे स्वच्छ नद्या असतात.

 

ते काय तिथे माता-बिता म्हणत नाहीत. आमच्याकडे सर्व प्रदुषणाचं पाणी आतमध्ये. राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी की गंगा स्वच्छ होणार. राज कपूरने यांनीही यावर चित्रपटही काढला होता.

 

लोकांना वाटलं झाली गंगा स्वच्छ. लोक म्हणाले अशी गंगा असेल तर आम्हीही अंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा अजून काही स्वच्छ करायला तयार नाहीत. या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतून बाहेर या”, असं आवाहनही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

 

आज 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यातून राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली.

 

राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट देखील काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती.

 

लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा.

 

आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी म्हटले. तर तसंच बाळा नांदगावकर यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता ते पाणी पिण्यास नकार दिल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. आता यावरून भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केलाय.

 

भाजप आमदार राम कदम म्हणाले की, मी स्वतः माझ्या कुटुंबासमोर तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले.

 

माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक त्या संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे.

 

त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय.

राम कदम पुढे म्हणाले की, मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. गंगा नदीत आतापर्यंत लाखो फॅक्टरी आणि गटारांचे आऊटलेट्स होते.

 

आता आपण बऱ्यापैकी ते कमी करत आणले आहे. आपल्याला अजून देखील काही काम करावे लागणार आहे. नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा एक भाग आहे.

 

पण, संगमाचे पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत.

 

कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले.

 

श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात.

 

आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते.

 

राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटले गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती.

 

लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी यावेळी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *