अंबड तालुक्यात रविवारीमध्यरात्री एक वाजेपासून संचारबंदी लागू
Curfew imposed in Ambad taluka from midnight on Sunday

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर एक वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने
संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह एकूण पाच जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे मसुद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे ता. दहा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत आहेत.
रविवारी (ता. 25) मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत अचानक अंतरवाली सराटी येथून मुंबईत येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ते अंतरवाली सराटीतून भांबेरीपर्यंत गेले. मनोज जरांगे यांच्या अचानक आंदोलनात झालेल्या बदलामुळे भांबेरी येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवाय जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर संचारबंदी लागू केली आहे.
संचारबंदी आदेश आल्याने मनोज जरांगे यांचा ताफा परत अंतरवाली सराटी कडे वापस निघाला आहे.सध्या मुंबईला जाणार नसल्याचे जरांगे
यांची माहिती दरम्यान रविवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.