ऑल इंडिया मजलीस- ए- इन्कलाबे-ए -मिल्लत च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी सय्यद सगीर अहमद

Syed Sagir Ahmed as Parbhani District President of All India Majlis-e-Inkalabe-e-Millat

 

 

 

ऑल इंडिया मजलीस- ए- इन्कलाबे-ए -मिल्लत या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सय्यद सगीर अहमद सय्यद वजीर अली यांची परभणी जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे

 

ऑल इंडिया मजलीस- ए- इन्कलाबे-ए -मिल्लत मिल्लत चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड एम ए खवी अब्बास यांनी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीचे पत्र सय्यद सगीर यांना दिले आहेत

सय्यद सगीर अहमद यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ,

 

सय्यद सगीर अहमद हे यापूर्वी ऑल इंडिया मजलीस ए इत्तिहादुल मुस्लिमीन एआयएमआय एम पक्षामध्ये जिल्हा स्तरावर कार्यरत होते त्यांनी मोठ्या चांगल्या पद्धतीने पक्षाचे काम केले

 

परभणी जिल्ह्यात एआयएमआयएम पक्षाचे ठिकठिकाणी पदाधिकारी नियुक्ती करणे पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती देणे आणि पक्ष वाढीसाठी काम मोठ्या प्रमाणात कार्य केले

 

परंतु पक्षाकडून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे ते गेल्या काही दिवसापासून नाराज होते परंतु आता त्यांची ऑल इंडिया मजलीस- ए- इन्कलाबे-ए -मिल्लत या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे

 

या पक्षा च्या माध्यमातून जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय काम त्यांच्याकडून होणार आहे जिल्हाध्यक्षपदावर नियुक्तीनंतर बोलताना सय्यद सगीर यांनी पक्षाची पाळे मुळे जिल्ह्याभरात रुजवण्यासाठी

 

आपण नेहमी तत्पर राहू आणि परभणी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्षांची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, आणि येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका,

 

जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पक्षातर्फे उमेदवार उभे करण्याचे पक्षाचे पक्षाने ठरवले असून त्या संदर्भात इच्छुक उमेदवारांसाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेण्यात येणार असल्याचे

 

नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सय्यद सगीर अहमद यांनी दैनिक खरादर्पण शी बोलताना सांगितले सय्यद सगीर अहमद यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती बाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *