मतमोजणीपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Serious allegations against the Collector even before the counting of votes

 

 

 

 

पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी

 

 

 

अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. या तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी

 

 

 

 

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत.

 

 

 

 

सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे.

 

 

 

सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌

 

 

 

 

सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते.

 

 

 

 

 

या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे.

 

 

 

 

जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणूनसातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिले आहे.

 

 

खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी खेड- आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत .

 

 

 

त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहे,

 

 

 

असे कट्यारे म्हणाले. आता जोगेंद्र कट्यारे यांच्या पत्रानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *