परभणीत संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
In Parbhani, a teacher committed suicide by hanging himself after being harassed by the institution's director.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मंगरूळ बु. येथील नरसिंह प्राथमिक शाळेतील सोपान उत्तमराव पालवे या शिक्षकाने आज रोजी पहाटे पेडगाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि, मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील नरसिंह प्राथमिक शाळेत मागील चार वर्षापासून प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या सोपान उत्तमराव पालवे यांनी बुधवार 16 एप्रिल रोजी शाळेत जात असताना उद्या सकाळी परत येईल असे सांगून शिक्षक सोपान पालवे घराबाहेर पडले होते.
मात्र गुरुवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान पाथरी रोडवर पेडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला . या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाली घटनास्थळी पोलीस ही दाखल झाले आणि त्यांची मृतदेह जिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेला आहे,
दरम्यान शिक्षक सोपान पालवे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या नोट मध्ये नरसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत मधुकर खळीकर यांनी फसवणूक केल्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे लिहिले असल्याचे सांगण्यात येत आहे .
चार वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिली नियुक्ती देतो म्हणून बळवंत खळेकर यांनी रोख वीस लाख रुपये घेतले होते ,शेती विकून व नातेवाईकाकडून उसनवारी करून ही रक्कम जमा करून दिली होती,
संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करून 2018 19 च्या संच मान्यतेनुसार 20% शालार्थ प्राप्त करून पगार चालू केली.
मार्च 2024 चे बिल नरसिंह प्राथमिक शाळा मंगरूळ बुद्रुक आणि नरसिंह प्राथमिक शाळा लोहगाव शाळेतील शिक्षकांचे मार्चमध्ये बिल 20 टक्क्यावरून थेट 60% ने पगार काढली यासाठी संस्थेने माझ्याकडून पुन्हा पाच लाख रुपये घेतले,
मात्र मार्च 2024 नंतर एप्रिल मे जून महिन्याचे बिल अद्यापही काढले नाही जुलैचे बिल 60 टक्क्यावरून पुन्हा 20% ने काढले, जून पासून मार्च 2025 पर्यंत बिल काढण्यासाठी संस्था सचिव बळवंत खळीकर हे अर्धी रक्कम घेत असल्याचे चिठ्ठी मध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती आहे ,
याबाबत विचारणा केली असता खलीकर यांनी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली व जबरदस्तीने राजीनामा लिहून घेतला असल्याचेही चिठीत नमूद करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे संस्थेच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही आत्महत्याच पर्याय असून संस्था सचिव बळवंत खळीकर हे जबाबदार असल्याचे सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे,
तसेच खळेकर यांना दिलेली वीस व नंतर दिलेले पाच लाख व्याजासह माझ्या मृत्यूनंतर पत्नी सागर सोपान पालवे यांना द्यावेत असे लिहिली आहे.
या घटनेमुळे किती मोठ्या प्रमाणात भ्रस्टाचार फोफावला आहे याची प्रचिती सोपान पालवे यांच्या आत्महत्या नंतर चव्हाट्यावर आला आहे.
याप्रकरणी त्यांच्या पत्नी सौ सागर पालवे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षक पालवे यांच्या पत्नी गर्भवती असून त्यांना एक मुलगी देखील आहे अशी माहिती मिळत आहे









