मतदान आटोपताच आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ

A game of numbers and percentages as soon as the polls are over

 

 

 

 

 

मतदान आटोपताच आता आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ नागपूरमध्ये सुरू झाला आहे. त्यावरून वेगवगेळे अंदाज वर्तविले जात आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहे.

 

 

 

 

 

उमेदवारांच्या मताधिक्याबाबत शंकाही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या मतांचा टक्का घसरला हे विशेष.

 

 

 

गडकरी यांनी मागील निवडणुकीत नाना पटोले यांना पराभूत केले होते. त्यावेळी सुमारे दोन लाख १६ हजारांचे मताधिक्य त्यांनी घेतले होते. यावेळी गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा केला आहे.

 

 

 

मात्र मतदानाच्या टक्केवारीत अवघी दोन टक्केच वाढ झाली आहे. विकास ठाकरे यांच्यासाठी एकत्र आलेले काँग्रेसचे नेते, दलित व मुस्लिमांसोबतच

 

 

 

हलबा समाजाची नाराजी आणि मोदी यांच्यावरच्या रोष बघता मताधिक्याबाबत आताच बोलणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

 

मागील लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार पराभूत झाले होते.

 

 

 

 

गडकरी लढले त्यावेळी सर्व सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार होते. त्यानंतर उत्तरमधून आमदार मिलिंद माने आणि पश्चिममधून सुधाकर देशमुख पराभूत झाले.

 

 

 

दक्षिणमधून मोहन मते आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात विकास कुंभारे थोडक्यात बचावले. गडकरी यांच्या विरोधात लढत असलेल्या विकास ठाकरे यांनी

 

 

 

 

पश्चिमधून ४९ टक्के मते घेतली तर उत्तरमधून नितीन राऊत यांनी ५१.६ टक्के मते घेतली. उत्तरमधून गडकरी मागील निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मागे होते. आता पश्चिम नागपूरमधून कुणाला धोका होणार, अशी चर्चा होत आहे.

 

 

 

 

२०१९ च्या निवडणुकीत पश्चिममधून गडकरी यांना ५४.०२ टक्के मते मिळाली होती. याच निवडणुकीत मध्य नागपूरमधून गडकरी यांना ५५.५५ टक्के मिळाली होती. लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यात सुमारे पाच टक्क्यांनी घट झाली.

 

 

 

आमदार कुंभारे यांना ५०.८ टक्के मिळाली होती. पूर्व नागपूरमधून ५७.२१ मते गडकरी यांना मिळाली होती. मात्र खोपडे यांना ५३.०६ टक्के मिळाली.

 

 

 

लोकसभेत दक्षिण- पश्चिममधून ५३.८२ मते मिळाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना ४९.३४ टक्केच मते मिळाली. एकूणच लोकसभेनंतर भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीत घट झाली होती. ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरू शकते.

 

 

 

 

 

नागपूर लोकसभा २०२४
दक्षिण-पश्चिम ५३.०३

दक्षिण नागपूर ५२.८०

 

 

 

पूर्व नागपूर ५५.७६

मध्य नागपूर ५४.०२

 

 

 

 

 

पश्चिम नागपूर ५३.७१

उत्तर नागपूर ५५.१६

 

 

 

 

 

लोकसभा २०१९
द-पश्चिम ५३.८२

दक्षिण ५३.१२

 

 

 

 

 

पूर्व ५७.२१

मध्य ५५.५५

 

 

 

 

पश्चिम ५४.०२

उत्तर ५४.७४

 

 

 

 

विधानसभा २०१९
द-पश्चिम ४९.३४

दक्षिण ५०.०८

पूर्व ५३.०६

 

 

 

 

 

मध्य ५०.०८

पश्चिम४९.०३

उत्तर ५१.०६

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *