मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्र्यांने दिला भाजपचा राजीनामा

Former union minister from Marathwada resigned from BJP

 

 

 

 

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

 

 

 

गेल्या 10 वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं, मी पक्षाची आभारी आहे असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं.

 

 

 

तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.

 

 

 

गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असून मी पक्षाची आभारी आहे. आता मी आपला निरोप घेते असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सूर्यकांता पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची जवाबदारी पक्षाने दिली होती.

 

 

 

 

हिंगोली मतदारसंघातून लोकसभेचं तिकीटासाठी त्या आग्रही होत्या. पण ती जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही. आयुष्यातील शेवटची निवडणूक लढवायची राहिली अशी जाहीर खंत त्यांनी व्यक्त केली होती.

 

 

 

सूर्यकांता पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले होते.

 

 

 

 

हदगाव मतदारसंघातून 1980 साली सूर्यकांता पाटील या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील

 

 

 

 

काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. 1991, 1998 आणि 2004 असे तीन वेळा त्या लोकसभेत खासदारपदी निवडून आल्या.

 

 

 

दरम्यान यापूर्वी निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपमधील अनेखी एका नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी

 

 

 

 

आपल्याला लोकसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याची खंत फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. आपल्या लोकसभा मतदार संघात आपल्याला जबरदस्तीने दूर लोटतय,

 

 

 

 

तीन लोकसभा जिथून जिंकल्या, एक हरले तरी माझा संपर्क तुटला नाही. स्नेहबंध अधिकच घट्ट झाले. तसेच, आयुष्याची शेवटची लोकसभा लढवायची राहून गेली असं देखील त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले होते .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *