अजितदादांचा आणखीन एक आमदार शरद पवारांची तुतारी फुंकणार !
Another MLA of Ajitdad will blow Sharad Pawar's trumpet!

विधानसभा निवडणुकात तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करत आहे. लोकसभेत चांगलं यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळत आहे.
तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुतीकडून लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे. असं सर्व असताना गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी चांगलीच फॉर्मात आहे.
अजित पवार यांच्याकडे असलेला एकएकजण पुन्हा पवारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडणार असल्याचे दिसत आहे.
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके वारंवार शरद पवारांच्या भेटी घेतायेत. यावरून आता जुन्नरच्या जनतेत संभ्रम सुरू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर जुन्नरचे आमदार अतुल बेनके काही दिवस तटस्थ होते. काही दिवसांनंतर ते अजित पवारांसोबत गेले. लोकसभेत तुतारी विरोधात काम केलं.
मात्र, आता हे प्रेम मात्र शरद पवारांवर असल्याने ते वारंवार सांगायेत. आज जुन्नरमधील ओतूर गावात एका कार्यक्रमात शरद पवार आले होते.
तेव्हा तर बेनके यांनी प्लेक्स बाजी करत शरद पवारांचे स्वागत सुद्धा केले. या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुद्धा रंगलिये. मात्र, लोकसभेला तुतारीला मिळालेले यश पाहता
अनेक जण माघारी येत असल्याचे जयंत पाटील सांगतायत. तोच तर विचार अतुल बेनके करत नाहीत ना असही बोललं जातंय.
आज ओतूरच्या कार्यक्रमाआधी नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या बैठकिला अतुक बेनके यांना पवारांनी टाळले अशा बातम्या आल्या. मात्र, बेनके यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
एकूणच अजित पवारांचे मोहरे शरद पवारांच्या प्रेमात आहेत. आणि टप्या टप्याने ते माघारी फिरत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.
विधानसभेच्या तोंडावर कोल्हापुरातील भाजप नेते समरजितसिंह घाटके यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकताच त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत तुतारी हातात घेणार असल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.








