मनोज जरांगेंची तब्येत बिघडली

Manoj Jarang's health deteriorated again ​

 

 

 

 

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. आंदोलन, उपोषण तसेच सततच्या दौऱ्यांमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.

 

 

 

अशातच आता आपला पाचव्या टप्प्यातील दौर, कार्यक्रम आटपून जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी रवाना झाले आहेत.

 

 

गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा नियमित दौरा सुरू असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली आहे. त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत आहे.

 

 

 

त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. प्रकृती सुधारल्यानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची तयारी करणार आहेत.

 

 

जरांगे पाटील मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली. जरांगे यांची चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील ओळख आहे.

 

 

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामुळे त्यांना क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नाही. आंदोलन, उपोषण, दौरे, सभा यामध्ये ते व्यस्त होते.

 

 

 

मैदानावर हातात बॅट घेत अंतरवाली सराटी येथील आपल्या मित्र कंपनीसोबत त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी बॅटिंग, बॉलिंग देखील केली.

 

 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ दिला होता. ती डेडलाईन आज संपत आहे, या पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये इशारा सभा घेतली.

 

 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली.

 

 

मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *