मराठवाडा विदर्भात भूकंपाचे धक्के

Earthquake tremors in Marathwada Vidarbha

 

 

 

 

मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, वसमतसह छत्रपती संभाजीनगरात आज सकाळी 7:15 च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

रिश्टर स्केलवर 4.0 इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के असल्याचे नोंदवण्यात आले आहे. नांदेड आणि हिंगोलीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के

 

 

जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

 

 

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज भूकंपाचे धक्के बसले. सकाळी सात वाजून 15 मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला.

 

 

 

सौम्य धक्के आणि जमिनीत गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन ते तीन वेळा भूकंपाचे हे धक्के बसले. काही सेकंदासाठी जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. याचे व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहेत.

 

 

हिंगोलीतल्या माळधामणी गावामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिक भयभीत झाले. गावात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

 

 

गावातले लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात असतानाच अचानक आवाज झाला आणि जमीन हादरली. तीन ते चार सेकंदासाठी झालेला हा प्रकार

 

 

 

 

सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आला नाही. पण जमीन हादरल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. काही वेळाने लोकांना हा भूकंप असल्याची जाणीव झाली.

 

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे सौम्य झटके बसले. तर परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजेच्या सुमारास धक्के जाणवले.

 

 

भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. हिंगोली जिल्यात ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली.

 

 

 

मराठवाड्यासह विदर्भातील वाशिम जिल्ह्याला सकाळीच भूकंपाने हादरवले. त्यामुळे नागरीक भयभीत झाले. अनेकांनी खुल्या जागांकडे धाव घेतली. हिंगोली, परभणी, नांदेडसह

 

 

 

वाशिम जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

 

 

 

प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. सकाळीच प्रशासकीय यंत्रणेने या भूकंपाची तीव्रता आणि कुठे हानी झाली का याचा आढावा घेतला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

 

 

आज सकाळी नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 7.14 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला.

 

 

 

नांदेड मध्ये भूकंपाची 4 पूर्णांक 05 अशी रिस्टर स्केलवर नोंद झाली आहे. या धक्यांने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर आले आहेत.

 

 

 

विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे

 

 

 

सकाळी 7:15 मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले.

 

 

2 महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि आजूबाजूच्या भागात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. तर रामेश्वर तांडा भागतही भूंकपाचे हादरे बसले होते.

 

 

 

आज हिंगोली शहर व हिंगोली सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

 

 

 

भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

 

 

 

तर अकोला जिल्ह्यातील काही भागातही धक्के बसले. अमरावती, चंद्रपूर ते तेलंगणात करीम नगरपर्यंत भूकंपाचे धक्के बसल्याचे दिसत आहे.

 

 

 

 

जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे

 

 

व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत, त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

 

 

भूंकपाचे सतत धक्के जाणवत आहेत. हिंगोली आणि परभणीत असे प्रकार समोर येत आहेत. या भूकंपची तीव्रता रि्श्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

 

 

ही तीव्रता अधिक आहे. त्यामुळे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करावे असे मत एमजीएम अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक तथा हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *