शरद पवारांच्या पक्षाची मागणी निवडणूक आयोगाने केली अमान्य ;निवडणुकीत फटका बसणार ?

Sharad Pawar's party's demand was invalidated by the Election Commission; will it suffer in the election?

 

 

 

राज्यातील विधान सभा निवडणूकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. राज्यातील दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होणार असल्याने याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

 

दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाच्या मागणीवर देखील निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केलेले आहे.

 

महाराष्ट्रात विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम निव़डणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिलेली आहे.

 

यावेळी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

या निवडणुक कायक्रम जाहीर करण्याच्या आधी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा केला होता.त्यावेळी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती.

 

यावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. यावर निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केले आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पक्ष फूटीनंतर निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेले आहे. या निवडणूक चिन्हाबाबत दोन शरद पवार गटाने दोन विनंती केल्या होत्या.

 

त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. पहिली विनंती होती की त्याचं चिन्हं योग्य नाही. ते मतपत्रिकेवर छोटं दिसतं.

 

तसचे दुसरी विनंती केली होती की तुतारी सारखं दिसणारं दुसरे चिन्हं हटविण्यात यावे. यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली आहे.

 

त्याची योग्य दखल घेतली आहे. ते पुढे म्हणाले की त्यांना तुतारी चिन्ह कसं दिसलं पाहिजे हे आम्ही त्यांना विचारलं.त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही ते मान्य केलं.

 

दुसरं चिन्ह हे सेम नाही. असं आम्ही त्यांना सांगितले आहे असेही आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीत याच पिपाणी चिन्हाचा मोठा फटका शरद पवार गटाला बसला होता.

 

विधानसभा निवनडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नसणार आहे.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा पुन्हा तुतारीला फटका बसण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी आहे.

 

मात्र लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतारीला फटका बसल्याची तक्रार शरद पवार गटाने केली होती.. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या..

 

नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत पिपाणी चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते.

 

त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

 

मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलंय.. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्षष्ट दिसतो, त्याचा आकार वाढवण्यात यावा ही मागणी मात्र आयोगाने मान्य केलीय.

 

निवडणुकीत चिन्ह किती महत्त्वाचं असतं, याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आला होता… तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी.

 

मात्र याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं… त्यामुळं राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसला.

 

 

राष्ट्रवादी शरद पवार गटानं लोकसभेला 10 जागा लढवल्या… त्यापैकी 8 खासदार निवडून आले… यापैकी जवळपास प्रत्येक मतदारसंघात पिपाणी या चिन्हावरील अपक्ष उमेदवारांनी हजारो मतं खाल्ल्याचं दिसून आलं.

 

तुतारी आणि पिपाणीचा घोळ झाला नसता तर साता-याचा खासदारही निवडून आला असता, असं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.

 

साता-यात भाजपच्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव केला
याठिकाणी पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.

 

 

दिंडोरीत तर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह असा दुहेरी फटका बसला.. भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार विजयी झाले..

 

मात्र त्यांच्या विरोधातील बाबू भगरे नावाच्या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 1 लाख 3 हजार 632 एवढी भरघोस मतं मिळाली. माढामध्ये रामचंद्र घुतुकडे या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला 58 हजार 421 मतं मिळाली.

 

बीडमध्ये अशोक थोरात नावाच्या पिपाणीवाल्या उमेदवाराला 54,850 मतं मिळाली. बारामतीत पिपाणीवाल्या शेख सोहेल शाह नावाच्या उमेदवाराला 14917 मतं पडली.

 

नगरमध्ये पिपाणीवाल्या गोरख आळेकरांनी 44,597 मतं घेतली. रावेरमध्ये पिपाणीवाल्या एकनाथ साळुंखेंना 43957 मतं पडली. शिरूरमध्ये पिपाणीवाल्या मनोहर वाडेकरांना 28,324 मतं.

 

भिवंडीत पिपाणीवाल्या कांचन वाखरेंना 24, 625 मतं मिळाली. याचाच अर्थ एकूण 9 जागांवर पिपाणी चिन्हामुळे सुमारे 4 लाख 10 हजार 385 मतांचा फटका बसल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे..

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *