माजी मंत्री शरद पवार यांची तुतारी फुंकण्याच्या तयारीत ?

Preparing to blow the trumpet of former minister Sharad Pawar?

 

 

 

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज

 

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. नुकतीच ढोबळे यांची बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन भाजपचा राजीनामा देण्याची मागणी केली होती.

 

भाजपमध्ये मागील 10 वर्षांपासून डावललं जात असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं लक्ष्मण ढोबळे भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

 

दरम्यान, लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोहोळ विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

मात्र, आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, अद्याप मी राजीनामा दिलेला नाही

 

. त्यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं की पक्षाचा राजीनामा द्या. त्यावर त्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून विचार करुन निर्णय घेईन असं कळवल्याचे ढोबळे म्हणाले.

 

 

मोहोळ विधानसभा मतदारसंघात चुरस वाढली असून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे पुत्र अभिजित ढोबळे यांनी विधानसभा निवडणूक लढवायची घोषणा केली आहे.

 

सध्या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने हे आहेत. ते राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यांच्यामागे माजी आमदार जारन पाटील यांची मोठी साथ आहे.

 

त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार गटाकडून यशवंत माने यांनांचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

तसेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उंमेश पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील पदासाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं आहे.

 

त्यांनी यशवंत माने यांच्या उमेदनवारीला विरोध केला आहे. तसेच दोन दिवसापूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे. त्यामुळं मोहोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *