विधानसभा निवडणूक ; बाप-लेक, काका-पुतण्यात संघर्ष

Legislative Assembly Elections; Conflict between father-lek, uncle-nephew

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना

 

उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे. तर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

 

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) विधानसभेसाठीच्या उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यापैकी पहिल्या यादीत ३८ तर दुसऱ्या यादीद्वारे सात उमेदवार जाहीर केले आहेत.

 

पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.

 

गेल्या वर्षी (२०२३) जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. अजित पवारांनी पक्षातील ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळी चूल मांडली.

 

तसेच या गटाला आपल्याबरोबर घेत त्यांनी राज्यातील तत्कालीन युतीच्या (शिंदेंची शिवसेना व भाजपा) सरकारमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

 

तर शरद पवारांच्या गटाला आपलं नावं बदलावं लागलं, तसेच नव्या निवडणूक चिन्हासह निवडणुका लढवाव्या लागत आहेत. गेल्या सव्वा वर्षांपासून या दोन पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

हा संघर्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही दिसणार आहे. शरद पवारांच्या पक्षाने ४४ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत.

 

दोन्ही पक्ष १५ मतदारसंघांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यातील १५ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

 

 

बारामतीत काका विरुद्ध पुतण्यात तर अहेरी मतदारसंघात बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. अजित पवारांनी अहेरी मतदारसंघातून धर्मराव अत्राम

 

यांना उमेदवारी दिली आहे. तर, शरद पवारांनी याच मतदारसंघातून अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

 

 

१५ मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ लढाई!
क्र. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. बारामती युगेंद्र पवार अजित पवार
२. इंदापूर हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे
३. आंबेगाव देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील

 

४. अहेरी भाग्यश्री अत्राम धर्मराव अत्राम
५. कागल समरजीत घाटगे हसन मुश्रीफ
६. मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड नजीब मुल्ला
७. हडपसर प्रशांत जगताप चेतन तुपे
८. वसमत जयप्रकाश दांडेगावकर चंद्रकांत नवघरे

 

९. वडगाव-शेरी बापूसाहेब पठारे सुनील टिंगरे
१०. चिपळूण प्रशांत यादव शेखर निकम
११. शिरुर अशोक पवार ज्ञानेश्वर कटके
१२. तासगाव – कवठे महांकाळ रोहित पाटील संजयकाका पाटील

 

१३. इस्लामपूर जयंत पाटील निशिकांत पाटील
१४. उदगीर सुधाकर भालेराव संजय बनसोडे
१६. कोपरगाव संदीप वर्पे आशुतोष काळे

 

राष्ट्रवादीची (शरद पवार) पहिली यादी
१ इस्लामपूर जयंत पाटील
२ काटोल अनिल देशमुख
३ घनसावंगी राजेश टोपे
४ कराड उत्तर बाळासाहेब पाटील

 

५ मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड
६ कोरेगाव शशिकांत शिंदे
७ वसमत जयप्रकाश दांडेगावकर
८ जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर

 

९ इंदापूर हर्षवर्धन पाटील
१० राहुरी प्राजक्त तनपुरे
११ शिरूर अशोक पवार
१२ शिराळा मानसिंगराव नाईक

 

१३ विक्रमगड सुनील भुसारा
१४ कर्जत जामखेड रोहित पवार
१५ अहमदपूर विनायकराव पाटील
१६ सिंदखेडराजा डॉ. राजेंद्र शिंगणे

 

१७ उदगीर सुधाकर भालेराव
१८ भोकरदन चंद्रकांत दानवे
१९ तुमसर चरण वाघमारे
२० किनवट प्रदीप नाईक

 

२१ जिंतूर विजय भांबळे
२२ केज पृथ्वीराज साठे
२३ बेलापूर संदीप नाईक
२४ वडगाव शेरी बापूसाहेब पठारे

 

२५ जामनेर दिलीप खोडपे
२६ मुक्ताईनगर रोहिणी खडसे
२७ मुर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे

 

२८ नागपूर पूर्व दुनेश्वर पेठे
२९ तिरोडा रविकांत बोपचे
३० अहेरी भाग्यश्री आत्राम
३१ बदनापूर रुपकुमार चौधरी

 

३२ मुरबाड सुभाष पवार
३३ घाटकोपर पूर्व राखी जाधव
३४ आंबेगाव देवदत्त निकम
३५ बारामती युगेंद्र पवार

 

३६ कोपरगाव संदीप वर्पे
३७ शेवगाव प्रताप ढाकणे
३८ पारनेर रानी लंके
३९ आष्टी महेबुब शेख

 

४० करमाळा नारायण पाटील
४१ सोलापूर उत्तर महेश कोठे
४२ चिपळून प्रशांत यादव

 

४३ कागल समरजीत घाटगे
४४ तासगाव-कवठे महांकाळ रोहित पाटील
४५ हडपसर प्रशांत जगताप

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी
१ बारामती अजित पवार
२ येवला छगन भुजबळ
३ आंबेगाव दिलीप वळसे पाटील

 

४ कागल हसन मुश्रीफ
५ परळी धनंजय मुंडे
६ दिंडोरी नरहरी झिरवळ

 

७ अहेरी धर्मरावबाबा आत्राम
८ श्रीवर्धन आदिती तटकरे
९ अंमळनेर अनिल पाटील

१० उदगीर संजय बनसोडे
११ अर्जुनी- मोरगाव राजकुमार बडोले
१२ माजलगाव प्रकाश सोळंके

 

१३ वाई मकरंद पाटील
१४ सिन्नर माणिकराव कोकाटे
१५ खेड आळंदी दिलीप मोहिते
१६ अहिल्यानगर शहर (अहमदनगर) संग्राम जगताप

 

१७ इंदापूर दत्तात्रय भरणे
१८ अहमदपूर बाबासाहेब पाटील
१९ शहापूर दौलत दरोडा
२० पिंपरी अण्णा बनसोडे

 

२१ कळवण नितीन पवार
२२ कोपरगाव आशुतोष काळे
२३ अकोले किरण लहामटे
२४ वसमत चंद्रकांत नवघरे

 

२५ चिपळूण शेखर निकम
२६ मावळ सुनील शेळके
२७ जुन्नर अतुले बेनके
२८ मोहोळ यशवंत माने

 

२९ हडपसर चेतन तुपे
३० देवळाली सरोज अहिरे
३१ चंदगड राजेश पाटील

 

३२ इगतपुरी हिरामण खोसकर
३३ तुमसर राजू कारेमोरे
३४ पुसद इंद्रनील नाईक

 

३५ अमरावती शहर सुलभा खोडके
३६ नवापूर भरत गावित
३७ पाथरी उत्तमराव विटेकर
३८ मुंब्रा कळवा नजीब मुल्ला

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *