मनोज जरांगे यांचा पुन्हा शिंदे सरकारला इशारा
Manoj Jarange warns Shinde government again

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती.
याच मुदतीवरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याच मुद्द्यावरून २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मराठ्यांशी गाठ आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी पुन्हा शिंदे सरकारला दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील बदनापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी सभा पार पडली. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले,
‘मराठा आरक्षणाची लढाई मराठा माय बापाने सुरु केली. त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्र्यानी शिष्टमंडळ पाठवलं. नेमका सरकारचा मानस काय? हे स्पष्ट झालं पाहिजे.
‘आज बैठक गरजेची होती. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात आरक्षणाचा विषय घेतला, त्यांना सांगायचं होतं, आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज काय? 54 लाख नोंदी सापडल्या, मग अडचण काय ? असा सवाल जरांगे यांनी केला.
‘सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला, त्यांना 40 दिवसाचा वेळ दिला. त्यानंतर पुन्हा आले. त्यांना 24 डिसेंबर.. असा एकूण साडे सात महिन्याचा वेळ दिला. आता कायदा पारित करायला अडचण काय? असा सवाल जरांगे यांनी सरकारला केला.
‘आजच्या बैठकीत काय झालं? मागच्या बैठकीत जे होते, त्यातले अर्धेच आले. काही आजारी पडले. तर काहींना काय सांगावं हे कळेना. आता ज्याच्या नोंदी सापडल्या, त्यांना आरक्षण मिळणार .
रक्तातल्या नात्यांना आरक्षण मिळणार, असं या शिष्टमंडळानी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की, दोन गोष्टी राहिल्या आहेत, त्या 23 डिसेंबरपर्यंत सांगतो, असं जरांगे म्हणाले.
‘आता नोटिसा देऊन वातावरण दूषित करत आहे. आम्ही मुंबईला जायचं म्हटलं तरी नोटीस देत आहेत. नोटीस मराठा समाजाला सावध करत आहे. सरकारला माझी विनंती आहे, तुम्ही गांभीर्याने घ्यावं. तुमच्या नोटीसाला मराठा घाबरत नाही, असंही जरांगे म्हणाले.