मालेगावचे उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका

Malegaon candidate MLA Mufti Ismail suffered a heart attack

 

 

 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र जोरदार सभा सुरू आहे. पण अशातच मालेगाव मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

 

मालेगाव मध्यचे एमआयएम उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. उपचारासाठी त्यांना तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

मालेगाव मध्यचे एमआयएम उमेदवार आमदार मुफ्ती इस्माईल यांना आज हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

मुफ्ती इस्माईल यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या दोन ते तीन वाहिन्या ब्लॉक असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. हॉस्पिटलमध्ये सध्या मुफ्ती इस्माईल यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

 

त्यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे आणि त्यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे असलेले माजी आमदार आसिफ शेख यांना मुफ्ती इस्माईल यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती मिळताच ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

 

इस्माईल यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. बाहेर प्रचारात एकमेकांवर उमेदवार टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पण, हॉस्पिटलमध्ये दोन्ही उमेदवार अशा नाजूक प्रसंगी एकत्र आल्याचे पाहून दोन्ही गटाचे समर्थक भारावून गेले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *