फडणवीसांनी ठरवले ,शिंदे -पवार दोघांपैकी नंबर 1 चा उपमुख्यमंत्री कोण?

Fadnavis decided, who will be the number 1 Deputy Chief Minister between Shinde and Pawar?

 

 

 

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सत्ता वाटपाचा संघर्ष सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर महायुती सरकारमध्ये क्रमांक 1 आणि क्रमांक दोनचा उपमुख्यमंत्री कोण

 

याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचेही म्हटले जात होते. राज्यातील महायुती सरकारमध्ये नंबर 1 चा उपमुख्यमंत्री कोण? याचं कोड आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवलं आहे.

 

राज्यातील महायुती सरकारमध्ये सुप्त सत्ता संघर्ष असल्याचे म्हटले जात होते. महायुतीच्या नेत्यांनी याचा इन्कार केला असला तरी कुरघोडी सुरू असल्याचे दिसून येत होते.

 

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा फेरआढावा घेतला जात आहे. त्याशिवाय, काही कामांची चौकशी सुरू आहे.

 

तर, दुसरीकडे नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्‍यांच्या गटाला शिवसेना शिंदे गटापेक्षा अधिक निधी मिळाला आहे.

 

त्यामुळे या सुप्त संघर्षाच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच विरोधकांनी नंबर एक आणि नंबर दोनचा उपमुख्यमंत्री कोण असे विचारत महायुती सरकारला चिमटे काढले होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या अधिकाराबाबत अधिक स्पष्टता आणली आहे. आता दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना समान अधिकार देण्यात आले आहेत.

 

डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर उपमुख्यमंत्र्‍यांच्या अधिकाराबाबत सुस्पष्टता आली नव्हती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून

 

विविध खात्यांच्या धोरणात्मक निर्णयाच्या फायली या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जात होत्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडील खात्यांचा समावेश होता.

आता, मुख्यमंत्र्‍यांनी अजित पवारांच्या अधिकारांवर नियंत्रण आणले असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्याकडून सगळ्या फाईली या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील.

 

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी जाणार आहेत. या निर्णयाने आता एकनाथ शिंदे यांना काहीसे बळ मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयार्थ जातील. स्वतः फडणवीस यांनी शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *