मराठवाडा,विदर्भासह राज्यात हुडहुडी, पुढील तीन दिवस गारे,गार
Marathwada, Vidarbha and other states will experience heavy rain and hail for the next three days
उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही आता गारठा वाढू लागला असून अजूनही थंडी सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी पोषक ठरणार आहेत.
मध्य आणि पूर्व भारतात येत्या 48 तासांत तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आता वातावरणात पुन्हा बदल झाल्याने हवामान खात्याने राज्यात थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. शिवाय अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली होती.
मकर संक्रांतीनंतर राज्यात हुडहुडी पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस राज्यातील गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यासह देशातील तापमानात गेल्या काही आठवड्यांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला होता. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात कुठे पाऊस तर कुठे थंडी असं चित्र
येत्या काही दिवसांत राज्यातील थंडीला सुरुवात होणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भात तापमान घसरण्याचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आजही देशासह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, बुधवारी राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून मैदानी प्रदेशात पोहोचणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या
हवामानावरही होताना दिसत आहे. परिणामी राज्याच्या तापमानात पुढील काही दिवसात घट होणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केली आहे.
राज्यात पुढील तीन दिवस गारठा वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशा खाली राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
आज देखील राज्याच्या अनेक भागात किमान तापमान 10 अंशाखाली पोहोचल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी किमान तापमानात आणखी घट नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी जळगावमध्ये 9.4, अहमदनगर 9.6, नाशिक 9.8, संभाजीनगर 9.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, पुण्यातील किमान तापमान 10.8 अंशांवर,
उद्या पुण्यातील किमान तापमान 10 अंशांखाली राहण्याची शक्यता आहे. त्याशिवाय यवतमाळमध्ये 11.5 अंश सेल्सिअस तर अकोल्यात तापमानाचा पारा 12.3 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती निर्माण केली. ऐन रब्बी हंगामातील पिके जोमात असताना अनेक भागात पाऊस झाला.
शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणारा हा पाऊस आता थांबला आहे. मात्र, तरी देखील हवामान खात्याने पुढील तीन दिवस काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम पश्चिम हिमालयीन प्रदेशावर होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे 16-17 जानेवारीला जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद येथे पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहील. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या विविध भागात तापमानाचा पारा घसरला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशच्या काही भागात दाट धुके पाहायला मिळत आहे.
चंदीगड, दिल्ली आणि आसामच्या काही भागात विरळ धुक्याचा प्रभाव जाणवणार असून कडाक्याची थंडी पडणार आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, थंडीचा परिणाम मराठवाड्यासह विदर्भात देखील जाणवणार आहे. मध्यप्रदेशकडून येणारे थंड वारे यासाठी कारणीभूत आहेत.