लोकसभेसाठी हे २३ मतदारसंघ फायनल;भाजपने केली निवडणूक निरीक्षकांची यादी जारी

These 23 constituencies are final for Lok Sabha; BJP has released the list of election observers

 

 

 

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे.

 

 

 

गेल्या निवडणुकीत भाजपनं २५ जागा लढवल्या होत्या. पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या सगळ्या मतदारसंघांसाठी भाजपनं निरीक्षकांची घोषणा केली आहे.

 

 

 

भाजपनं २३ मतदारसंघांसाठी निरीक्षक जाहीर केले आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी दोन निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या पदांसाठी भाजपनं विद्यमान आमदार, खासदार,

 

 

मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. स्थानिक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

 

 

 

स्थानिक आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासोबत निरीक्षक संवाद साधतील आणि त्याचा अहवाल वरिष्ठांना देतील. या माहितीचा उमेदवारी देताना केला जाईल.

 

 

पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना बीडमधून लोकसभेसाठी संधी देण्यात येईल, अशी चर्चा होती. पण भाजपनं त्यांच्याकडे उत्तर मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

 

 

भाजपचे गोपाळ शेट्टी या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ४ लाख ६५ हजारांचं मताधिक्क्य मिळवलं होतं.

 

 

 

इतका मोठा विजय राज्यात अन्य कोणत्याही उमेदवाराला मिळाला नव्हता. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सेफ मानला जातो. यंदा इथून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत.

 

 

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं नाव रावेर लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहे. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.

 

 

भाजपनं महाजन यांच्याकडे ईशान्य लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुनगंटीवार यांच्याकडे बीडची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

 

ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याकडे नागपुरची जबाबदारी सोपवण्यात आलं आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला बारामती आणि चंद्रपुरात पराभव पत्करावा लागला होता. त्या मतदारसंघांसाठी भाजपनं निरीक्षक नेमलेले नाहीत.

 

 

 

भाजपच्या निरीक्षकांची पूर्ण यादी-
भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे

 

 

नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे

 

 

अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख

 

 

बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ

 

 

 

माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे

 

 

भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील

 

 

अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर

 

 

उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *