विधानसभेचे तिकीट कापल्याने कार्यकर्ते संतप्त ;दिल्लीतून फोन येताच जल्लोष

Activists angry over cutting of assembly tickets; Jubilation as phone calls from Delhi

 

 

 

दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून दोन तासात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दक्षिण शहर जागेवरून वाद झाला होता.

 

माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांकडून आधी ठिय्या आंदलन केलं गेलं, पण त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. याला कारण ठरलं ते दिलीप माने यांच्यासाठी खास दिल्लीतून आलेला निरोप.

 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी देऊन ही जागा आपली असल्याचा दावा केला गेला,

 

तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप माने हे मतदारसंघाकडून काँग्रेसकडून इच्छुक होते. दिलीप माने यांच्या समर्थकांकडून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केलं तर

 

रात्री सात वाजता दिलीप माने यांच्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांचा दक्षिण सोलापूरचा मतदार संघ काँग्रेसला सुटल्याचा दिल्लीवरून कॉल आला,

 

त्यामुळे ठिय्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अचानक जल्लोष करायला सुरुवात केली, त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

 

महाविकास आघाडीतील जागा वाटपात सोलापूर दक्षिणची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली, त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना

 

एबी फॉर्म देऊन उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे काँग्रेस कडून इच्छुक असणारे अनेक उमेदवार नाराज झाले. काँग्रेस पक्षाला दक्षिण सोलापूरची जागा सोडावी

 

यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे मनधरणी करायला सुरूवात झाली होती. माजी आमदार दिलीप माने यांचं नाव काँग्रेसकडून आघाडीवर होतं.

 

 

दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघात मशाल पेटणार ही बातमी मतदार संघातील माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. मात्र त्यानंतर दिलीप माने समर्थकांनी माने यांच्या निवासस्थानासमोर जमायला सुरुवात केली

 

आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना दिलीप माने यांच्याजवळ व्यक्त केल्या. दिलीप माने यांनी

 

भाषणात बोलताना दक्षिण सोलापूर मधून काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास 29 तारखेला अर्ज भरण्याचा इशारा दिला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात जिल्ह्यात 11 मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *