अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर

The fourth list of candidates of Ajit Pawar's NCP has been announced

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपत जात असताना विविध पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी घाई केली आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आता चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीतून दोघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे अजित पवारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५१ उमेदवारांना संधी दिली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये बंडखोरी झाली. अजित पवारांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्यासोबत घेऊन भारतील जनता पक्षाला समर्थन दिलं.

 

त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादींना हवीतशी जादू करून दाखवता आली नाही.

 

त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं. त्यामुळे विधानसभेत अजित पवार एकला चलो रे ची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं.

 

परंतु, आम्ही महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर महायुतीत त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

आतापर्यंत अजित पवारांनी पक्षातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर, भाजपाने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर केले असून शिंदेंनी सहयोगी मित्र पक्षांसह ८० जागा जाहीर केल्या आहेत.

 

म्हणजेच २७७ जागांचा तिढा सुटला असून उर्वरित १० जागा अद्यापही जाहीर होणे बाकी आहे. त्या कोणाच्या वाट्याला जाता हे पाहावं लागणार आहे.

 

 

दरम्यान, महायुतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला नव्हता. अनेक जागांवर मतभेद असल्याने त्यांनी थेट स्वंतत्रपणे उमेदवारच जाहीर केले. त्यामुळे उर्वरित १० जागा जाहीर झाल्यानंतरच महायुतीतील फॉर्म्युला स्पष्ट होईल.

 

ImageImage

 

Image

 

 

 

Image

 

 

 

Image

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *