पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक आरोप ;अजितदादांनी माझं सरकार पाडलं

Prithviraj Chavan's sensational allegation: Ajit Dada brought down my government

 

 

 

“माझ्यावर आरोप झाले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले, याच्यावर 70 हजार कोटींचा आरोप करुयात. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते.

 

माझ्यावर ज्यादिवशी आरोप झाला तेव्हापासून महाराष्ट्राची 1 मे 1960 ला निर्मिती होऊन ते आरोपाच्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च 42 हजार कोटींचा झाला

 

आणि मला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला म्हणाला. त्यातून एक फाईल निर्माण झाली. ती फाईल गृह खात्याला जाते. त्याने त्या फाईलीवर अजित पवारांची उघड चौकशी करावी म्हणून सही केली.

 

केसाने गळा कापायचे धंदे आहेत”, असे म्हणत अजित पवारांनी धक्कादायक आरोप केला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंचन घोटाळा हा काय अजित पवार यांची पाठ सोडत नाही.

 

मी जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता. मी माझ्या कार्यकाळात कधीच 70 कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता.

 

ती फाईल माझ्याकडे आली नाही. माझी कुठल्याही फाईलवर सही नाही. त्यामुळे सिंचन घोटाळ्यात मी चौकशी लावली नव्हती, माझा नाहक बळी घेतला आणि 2014 साली

 

अजित पवार यांनी माझं सरकार पाडलं आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ केली, असं धक्कादायक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *