मनोज जरांगे ॲक्शन मोडमध्ये,दिवाळीत बॉम्ब फोडणार
Manoj Jarange will explode in Diwali, in action mode
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्याची मुदत संपली असून मैदानात कुणाचे किती उमेदवार आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे.
तर दुसरीकडे लोकसभेमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडणारे मनोज जरांगे पाटील आता सक्रीय झाले आहे. मनोज जरांगे उद्या गुरुवारी विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार आहे. त्यामुळे या बैठकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपताच जरांगे पाटील सक्रीय झाले आहे. गुरुवारी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत मनोज जरांगे पाटील चर्चा करणार आहे.
मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचं समीकरण जुळवण्यासाठी जरांगे ही बैठक घेत असल्याचं कळत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे.
मनोज जरांगे विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार आहेत. मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंसोबत यावेळी चर्चा करणार आहेत. मराठा, दलित, मुस्लिम
या समाजाचं समीकरण जुळवण्यासाठी जरांगे पाटील यांचा प्रयत्न असल्याचं सांगितला जात आहे. 31 ऑक्टोबरला इच्छुक उमेदवार, अपक्ष उमेदवार, पक्षाचे उमेदवार कोणीही अंतरवाली सराटीत येऊ नये, असं आवाहन देखील जरांगे यांनी केलंय.
दरम्यान, उद्या बैठक घेतल्यानंतर मनोज जरांगे 2 नोव्हेंबर रोजी दिवाळी पडव्याच मुहूर्त साधून निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की नाही या बाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.