अर्ज मागे घेतले नाही तर बंडखोरांना …”, उद्धव ठाकरेंचा इशारा
If the application is not withdrawn, the rebels will …”, warned Uddhav Thackeray
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना आणि अपक्षांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे.
आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. तसंच ज्या ठिकाणी बंडखोरी किंवा अपक्ष लढण्याचा निर्णय ज्यांनी निर्णय घेतला आहे
त्यांना आम्ही अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. अर्ज मागे घेतले गेले नाहीत तर मात्र आम्ही अशांवर कारवाई करु. दुपारी ३ नंतर यासंबंधीचं चित्र स्पष्ट होईल” असं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्यासह संजय राऊतही होते.
त्यानंतर सिल्वर ओक या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी बंडखोरी करणाऱ्यांना आणि
अपक्ष फॉर्म भरलेल्या उमेदवारांना फॉर्म मागे घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत असं सांगितलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर या दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. त्यात उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतले दोन प्रमुख नेते असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांची इच्छा आहे की ज्यांनी बंडखोरी केली आहे
किंवा अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी अर्ज मागे घ्यावे. आमची भूमिका अशी आहे की कुणीही एकमेकांच्या विरोधात लढू नये. एकत्र काम करावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“आम्ही आमच्या पक्षांतल्या सगळ्यांना सूचना देत आहोत. काहीजण अर्ज मागे घेण्यासाठी जात आहेत. अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. दुपारी ३ नंतर हे चित्र स्पष्ट होईल. कुणी अर्ज मागे घेतले नसतील तर
मात्र पक्ष म्हणून प्रत्येकाला नाईलाजाने कारवाई करावी लागेल. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना आमच्या सूचना गेल्या आहेत.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
शेकापशी आमची चर्चा झाली आहे. आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही उरणची जागा लढतो आहोत. तर अलिबाग, पेण, पनवेल या ठिकाणी शेकाप जागा लढत आहे. आम्ही त्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत असंही उद्धव ठाकरेंनी ) स्पष्ट केलं.
मैत्रीपूर्ण लढतीच्या रस्त्याने जाण्याची आमची मुळीच इच्छा नाही. तीन वाजता आम्हाला जे काही चित्र आहे ते समजेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच रश्मी शुक्ला यांच्याबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो योग्यच आहे असंही शरद पवार म्हणाले.