ISIS संबंधांच्या आरोपांवरून महाराष्ट्रात NIA ची मोठी कारवाई, 14 जणांना ताब्यात घेतले

NIA's major crackdown on allegations of ISIS links, arrests 14

 

 

 

 

आयसीसशी  संबंधांच्या आरोपांवरून एनआयएने  ठाणे  जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आले.

 

 

पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या कडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे.

 

साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.

 

 

NIA ने पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केलीय. त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एनआयए कडून छापे टाकण्यात आलेत.

 

 

या छापेमारीत इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 14 जणांना ताब्यात घेण्यात आलाय तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्यांमधे पुण्यातील तिघांचा समावेश आहे. या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर दोघेजण मोमिनपुरा भागात राहणारे आहेत.

 

 

ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी , कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु आहे. हसीब मुल्ला , मुसाफ मुल्ला , रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी ,आदिल खोत, मुखलीस नाचन ,

 

 

सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर के पी याना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

18 जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोघाना पकडलं होतं.

 

 

तर त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात  पुढची लिंक उघडकीस आली आहे.

 

 

पुण्यात कोंढव्यातील तालाब मश्जीद परिसरात पहाटे कारवाई झाली. तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं . देशभरात सुमारे 2500 जणांची चौकशी सुरू आहे.

 

 

NIA ने पहाटेपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केलीय. त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एन आय ए कडून छापे टाकण्यात आलेत.

 

 

या छापेमारीत इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून 15 जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. तर शेकडो जणांची चौकशी सुरू आहे.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्यांमधे पुण्यातील तिघांचा समावेश आहे. या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर दोघेजण मोमिनपुरा भागात राहणारे आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *