मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वात जास्त मराठवाड्यावर जोर लावतायेत ,काय आहे कारण ?

Chief Minister Eknath Shinde emphasizes on Marathwada the most, what is the reason?

 

 

 

लोकसभा निवडणुकीत अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकल्यानंतर पायाला भिंगरी बांधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात जागा निवडून आणल्या. आताही विधानसभा निवडणुकीत ८० पेक्षा अधिक जागा लढवताना

 

त्यांच्या सभांचा महाराष्ट्रभर धडाका असणार आहे. जवळपास ६० हून अधिक सभा ते महाराष्ट्रभर घेणार आहेत. यापैकी सर्वाधिक २० ते २५ सभा ते मराठवाडा

 

विभागात आयोजित करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक लक्ष का केंद्रित केले आहे? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.

खरे तर मराठवाडा म्हणजे शिवसेनेची पाळेमुळे रुजलेली भूमी. बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्वाकडे आकर्षित होऊन अनेक नेत्यांनी शिवसेनेत कित्येक वर्ष काम केले.

 

मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट अशा त्यावेळच्या तरुणांना बाळासाहेबांनी संधी दिली. नव्वदीच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या डरकाळीने मराठवाड्यात काँग्रेसला पर्याय म्हणून

 

अनेकांनी शिवसेनेला पसंती दिली. त्यामुळे शिवसेनेची पाळेमुळे मराठवाड्यात खोलवर रुजली. जनतेनेही शिवसेनेला नाराज केले नाही. प्रत्येक निवडणुकीत सेनेला मराठवाड्यात यश मिळत राहिले.

 

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर, शिवसेना पक्षात फूट पडलेली असताना संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

 

शिवसेनेचे मराठवाड्याचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. साहजिक एकनाथ शिंदे यांचे मराठवाड्याकडे सर्वाधिक लक्ष आहे.

 

दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाने राज्याचे राजकारण तापलेले आहे. आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेले आंतरवाली सराटी हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गाव. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या लढ्याने त्यांना राज्यात ओळख मिळाली.

 

आरक्षण द्या नाहीतर पाडतो, अशी थेट भूमिका घेतल्याने लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसला. त्यांचा सर्वाधिक रोष देवेंद्र फडणवीस पर्यायाने भारतीय जनता पक्षावर होता.

 

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सत्ताधारी महायुतीला जबरदस्त फटका बसला. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता मराठवाड्यातील बाकीच्या सर्व जागांवर महायुतीचा पराभव झाला.

मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत असले तरी ते राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना मात्र दूषणे देत नाहीत. मनोज जरांगे हे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याचे टाळत आहे.

 

एकनाथ शिंदे हेच आरक्षण देऊ शकतात, असे म्हणून जरांगे शिंदेंची अधूनमधून कड घेत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या उमेदवारांना मराठवाड्यात फारसा फटका बसणार नाही,

 

असे चित्र आहे. हेच ओळखून भारतीय जनता पक्षाने जागावाटपात मराठवाड्यात शिवसेनेला जास्त जागा दिल्या आहेत.

 

त्यामुळे राज्यभरात घेत असलेल्या ६० सभांपैकी जवळपास २० ते २५ सभा मुख्यमंत्री शिंदे मराठवाड्यात घेणार आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोपाला ते अजून धार लावतील.

 

तसेच काँग्रेस पक्ष मुस्लीम धार्जिणी भूमिका घेत असल्याचे सांगून हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न शिंदे करताना दिसतील.

 

या माध्यमातून शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत याकरीता मुख्यमंत्री शिंदे मराठवाड्यात सर्वाधिक लक्ष केंद्रित करतील.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *