अब्दुल सत्तार म्हणाले एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं’;म्हणाले उद्धव ठाकरेंचे मतदारसंघात स्वागत
Abdul Sattar said I made Eknath Shinde the Chief Minister'; said Uddhav Thackeray's welcome to the constituency
विधानसभा निवडणुकीचं मतदान जसंजसं जवळ येत आहे. तसंतसं राजकीय आरोप-प्रत्यारोपानं चांगलाच जोर पकडला आहे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी आपला मित्रपक्ष असलेल्या भाजपला घरचा आहेर दिला आहे,
तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे, सोबतच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे, असं वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे.
भाजपचे लोक खडखड करत आहेत, त्यांच्यासाठी मी म्हणालो की आम्ही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो कारण मी गुवाहाटीला गेलो बिर्याणी खाल्ली आणि मुख्यमंत्री बदलला.
एका शेतकऱ्याच्या मुलाला मी मुख्यमंत्री केलं, मला मुख्यमंत्री बदलण्याचा अनुभव आहे. मी हिंदुत्ववादी असलेल्या एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं,
एमआयएमचा मुख्यमंत्री केला नाही. आम्ही बंड केलं नसतं तर भाजपचे लोक सत्तेत आले असते का? आणि पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच होणार असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी रावसाबेह दानवे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत मला मदत केली असती तर मला प्रचार करण्याची गरज पडली नसती.
राजकारणात लपून छपून काम करणाऱ्या लोकांचे काय हाल होतात हे त्यांनी लोकसभेमध्ये पाहिलं आहे. मी लोकांकडे त्यांच्यासाठी मतं मागितली मात्र लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत, त्याचं खापर ते माझ्या डोक्यावर फोडत आहेत,
आतापर्यंत लोकांनी धक्के आणि लाथा सहन केल्या, मात्र हे खूप महागात पडतं एखाद्याला धक्का मारला तर लोक परत बुक्का मारतात हे मी त्यांना समजून सांगितलं, असा टोला यावेळी सत्तार यांनी लगावला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. सिल्लोड मध्ये उद्धव ठाकरे यांची जी सभा आहे, ती शिवसेनेची आहे की भाजपची हे कळत नाही
उद्धव ठाकरे येत आहेत त्यांचे मी स्वागत करतो, मात्र एक लाख वीस हजार मतांनी माझाच विजय होईल, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.