मोहम्मद अझरुद्दीनच्या प्रचाराची धूम ;तेलंगणा विधानसभा निवडणूक
Mohammed Azharuddin's campaign boom; Telangana assembly election
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 साठी प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, हैदराबादच्या ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
अझरुद्दीन यांनी बुधवारी सांगितले की, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनकडून उमेदवार उभे करण्याची मला चिंता नाही. ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील जनता आपल्यासोबत असल्याचे अझरुद्दीन यांनी ठणकावून सांगितले.
. असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील AIMIM ने प्रथमच ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातून मोहम्मद रशीद फराजुद्दीन यांना उमेदवारी दिली आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने विद्यमान आमदार एम गोपीनाथ यांना या प्रदेशातून उमेदवार केले आहे.
अझरुद्दीन म्हणाले की, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. कोण काय करतंय याची आम्हाला पर्वा नाही. मी स्वतः निवडणूक लढवत आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि मला माहित आहे की ज्युबिली हिल्सचे लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
ते पुढे म्हणाले की, येत्या 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा प्रचार चांगला सुरू असून त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात कोणताही विकास झालेला नाही. याशिवाय समाजकंटकही फोफावत आहेत. अझरुद्दीन म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकेल आणि तेलंगणात सरकार स्थापन करेल.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, अझरुद्दीन यांनी 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. 2018 मध्ये त्यांना तेलंगणा काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवण्यात आले.