‘या’ राज्यांना तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गारठा वाढणार
'These' states are warned of unseasonal rain for three days, hail will increase

उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच कडाक्याची थंडी त्यात आता पावसामुळे आणखी बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढचे दोन दिवस तापमाणात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शिवाय पठारी प्रदेश आणि पूर्व भारतात दाड धुके राहणार आहे.
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये ६-९ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पूर्व भारतात १०-१२ अंश तापमान आहे.
सकाळी संपूर्ण उत्तर भारत दाट धुक्यात गायब झालेला असतो. जीथे धुक्याचे प्रमाण खूपच कमी असते अशा राज्यांनाही दाट धुक्याचा सामना करावा लागत आहे.
त्यातच येणाऱ्या दोन तीन दिवसात या भागात दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये
कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. १४ जानेवारी पर्यंत शाळा बंद राहणार आहेत. अनेक मार्गावरची वाहतूक आणि विमानांचे मार्ग देखील वळवण्यात आले आहेत.