मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात भाषणावेळीच महिलांचा गोंधळ

Confusion of women during the Chief Minister's speech

 

 

 

यवतमाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

 

महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यक्रमावेळी काही महिलांनी

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. आधी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणा महिलांनी दिल्या. यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरणही निर्माण झालं.

 

स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असतानाच मंडपात एका ठिकाणी महिलांनी गोंधळ घातला. या महिलांना पोलिसांनी शांत करत मंडपाच्या बाहेर नेलं.

 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात घोषणाबाजी करत महिलांनी निषेध केला. आधी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी या महिलांनी केली. याचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.

 

लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आधी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता.

 

लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे पण आज महायुती सरकारने लोकांना जे हवं आहे ते दिलं. महाराष्ट्र बंद म्हणणाऱ्यांची तोंडं बंद झाली असतील ही गर्दी बघून. 1 कोटी 7 लाख बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले तुमचं अभिनंदन करतो.

 

विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेला विरोध केला जात आहे. तसंच योजना बंद केली जाणार असल्याचे दावेही केले जातायत. यावरूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

 

ते म्हणाले की, विरोधक ही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र ही योजना कायम स्वरुपी चालू राहणार आहे. हे घेणारं नाही तर हे देणारं सरकार आहे.

 

आता 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला. फेक नरेटिव्ह मांडून विरोधकांनी लोकसभेत मते घेतली असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *