ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत आज सुप्रीम कोर्टात झाली अंतिम सुनावणी

The final hearing regarding the use of EVM and VVPAT was held in the Supreme Court today

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी झाली. आम्ही संशयाच्या आधारावर निवडणूक किंवा संविधानिक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाला नियंत्रित करू शकत नाही,

 

 

 

 

असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. मात्र, व्हीव्हीपॅट आणि प्रत्यक्ष मतदानाची शंभर टक्के पडताळणी करण्याच्या मागणीवर कोर्टाकडून आज निकाल देण्यात आला नाही. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

 

 

 

सुप्रीम कोर्टामध्ये व्हीव्हीपॅटच्या अनुषंगाने दाखल विविध याचिकांवर आज अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने आयोगाला  दुपारी दोन वाजेपर्यंत काही मुद्यांवर माहिती देण्यास सांगितले होते.

 

 

 

 

ही माहिती आयोगाने सादर केल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला. मात्र, सुनावणीदरम्यान महत्वाची निरीक्षणेही कोर्टाने नोंदवली आहेत.

 

 

 

 

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्याकडून याचिकाकर्त्यांची बाजू मांडली जात आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी म्हटले की, व्हीव्हीपॅट संबंधात अजूनही एकही तक्रार समोर आलेली नाही.

 

 

 

 

आम्ही संशयाच्या आधारावर काही आदेश देऊ शकत नाही. तुम्ही ज्या रिपोर्टचा आधार घेत आहात, त्यामध्येही आतापर्यंत हँकिंगची कोणतीही घटना घडली नसल्याचे म्हटले आहे.

 

 

 

 

 

आम्ही दुसऱ्या संविधानिक संस्थेला नियंत्रित करू शकत नाही. आम्ही निवडणुकीला नियंत्रित करू शकत नाही. व्हीव्हीपॅटमध्ये काही सुधारणांची गरज असेल तर आम्ही करू.

 

 

 

आम्ही या प्रकरणात दोनदा दखल दिली आहे. आधी व्हीव्हीपॅट बंधनकारक करण्यामध्ये आणि पाच टक्के व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी होत आहे.

 

 

 

न्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार फ्लॅश मेमरीमध्ये कोणताही दुसरा प्रोग्राम फीड केला जाऊ शकत नाही. त्यामध्ये केवळ निवडणूक चिन्ह अपलोड केली जातात. तांत्रिक बाबींबाबत आम्हाला आयोगावर विश्वास ठेवावा लागेल.

 

 

 

प्रशांत भूषण यांनी त्यानंतरही आपला दावा कायम ठेवला. निवडणूक चिन्हासोबत एखादा चुकीचा प्रोग्राम अपलोड केला जाऊ शकतो. माझा संशय या गोष्टींवर आहे,

 

 

 

 

 

असे प्रशांत भूषण सुनावणीदरम्यान म्हणाले. त्यावर कोर्टानेही तुमची बाजू समजली, आम्ही निकालामध्ये ही बाब विचारात घेऊ, असे म्हटले आहे.

 

 

 

कोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये मायक्रो कंट्रोलर हे उपकरण कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये, मायक्रो कंट्रोलरमध्ये एकदाच सर्व माहिती सेट केली जाते की त्यामध्ये पुन्हा बदल करता येतो,

 

 

सिम्बॉल लोडिंग युनिट किती आहेत, या प्रश्नांचा समावेश आहे. तसेच मशिनमधील माहिती 30 की 45 दिवस जतन केले जाते

 

 

 

आणि ईव्हीएमच्या तिन्ही युनिट एकत्रित सील केल्या जातात की कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट वेगळे ठेवले जाते, असेही प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *