महिलेच्या एका चुकीने घात,बोटीला भीषण आग लागून १४८ जणांचा मृत्यू ;पाहा थरकाप उडविणारा VIDEO

A woman's mistake caused a massive fire on a boat, killing 148 people; watch the shocking VIDEO

 

 

 

 

किंशासा येथील कांगो नदीत झालेल्या बोट दुर्घटनेनं जग हादरुन गेलं आहे. या अपघातात आतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला असून कित्येक जण अद्याप बेपत्ता आहेत.

 

कांगो आफ्रिका खंडातील दुसरी सगळ्यात मोठी नदी आहे. ही नदी मध्य आफ्रिकेतून वाहते. डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगोमध्ये नदीचं बहुतांश पात्र आहे.

 

लाकडापासून तयार करण्यात आलेल्या एचबी कोंगोलोनं अचानक पेट घेतला. आग लागल्यानंतर पुढील काही मिनिटांत बोट उलटली. अपघात झालेली बोट मतानकुमू बंदरातून रवाना झाला होती.

 

ती बोलोंबाच्या दिशेनं जात होती. बोटीत असलेली महिला स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना पडलेल्या ठिणगीनं भडका उडाला. त्यानंतर पुढील काही मिनिटांत आग संपूर्ण जहाजात पसरली.

 

अंगावर काटा आणणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जहाजातील प्रवासी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी नदीत उड्या मारत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

 

 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बोटीत ५०० जण होते. आग पसरताच एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी नदीत उड्या टाकल्या. पण यातील अनेकांना पोहोता येत नव्हतं. त्यामुळे कित्येकांचा बुडून मृत्यू झाला.

इक्वेटर मतदारसंघाचे खासदार जीन-पॉल बोकेत्सु बोफिली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत जवळपास १५० जण गंभीररित्या होरपळले. मात्र त्यांना अद्याप तरी वैद्यकीय सहायता मिळालेली नाही.

 

 

जवळपास १०० जणांना मबांडाकातील स्थानिक सभागृहात ठेवण्यात आलं आहे. तिथे त्यांना मिळणाऱ्या सुविधा अतिशय मर्यादित आहे. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण तिकडेही संसाधनांची मोठी कमतरता आहे.

 

कांगोतील वाहतूक व्यवस्थेची अवस्था अतिशय बिकट आहे. दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नद्यांच्या मार्गे बरीचशी वाहतूक चालते.

 

पण बोटी, जहाजांची खराब अवस्था, त्यात होणारी गर्दी, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन होणारा प्रवास अनेकदा धोकादायक ठरतो

 

आणि अपघातांना निमंत्रण मिळतं. गेल्या काही वर्षांमध्ये अपघातांचा आकडा वाढला आहे. त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *