शरद पवार मोदींना म्हणाले “तुम्ही आमच्या ताटातील घेऊ नका’
Sharad Pawar told Modi 'Don't take from our plate'
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते बारामतीमध्ये आयोजित व्यापारी मेळाव्यात बोलत होते. जीएसटीच्या मुद्द्यावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जीएसटी इशु हा अत्यंत महत्वाचा आहे. जीएसटी कॉन्सिल ही संस्था वेगळी संस्था आहे. प्रत्येक राज्याचा अर्थमंत्री हा कंपल्सरी त्याचा सभासद आहे.
त्याच्या गैरहजेरीमध्ये अर्थ खात्याचे सचिव गेले वरिष्ठ अधिकारी गेले, त्यांना तिथे मत मांडण्याचा अधिकार नाही. दुर्दैवाने महाराष्ट्राचे अर्थमंत्री त्या बैठकीला सतत गैरहजर राहिले.
त्यामुळे महाराष्ट्राची भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जेव्हा अर्थमंत्र्यांपेक्षा वरिष्ठ मंत्र्यांकडे आम्ही जीएसटीचा प्रश्न उपस्थित केला,
तेव्हा त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं तुमचे लोक हजर राहत नाहीत. महिना पंधरा दिवसांनी वेगळे चित्र दिसले तर हा जीएसटीचा प्रश्न आम्ही अधिक गांभीर्यानं घेऊ असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. टाटांना नागपूरला जागा दिली, सरकार बदललं टाटा म्हणाले मी नागरपूरला कारखाना काढू शकत नाही.
मोदी साहेबांचं पंतप्रधान पद हे आमचा कारखाना हलवायला उपयोगी पडलं. वेदांता पॉक्स काॅन ही कंपनी दिल्लीतून हुकूम आला आणि गुजरातला गेली.
गुजरात हा आमचा भाऊ आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आमच्या ताटातील घेऊ नका, तुम्ही तुमच्या ताटात तयार केलं तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, असा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान मी फक्त दहा जागा लढवल्या, त्यातील आठ ठिकाणी आम्हाला विजय मिळाला. पाच वर्षांपूर्वी आमची चार लोक निवडून आले होते आणि
काँग्रेसचा एक.नवीन खासदारांची बैठक मी घेत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याचा फायदा महाराष्ट्राची भूमिका लोकसभेमध्ये मांडण्यासाठी त्यांना होतो, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.