संयुक्त अरब अमिरातमध्ये विमान कोसळले; भारतीय वंशाचा डॉक्टर ठार

Indian-origin doctor killed in plane crash in UAE

 

 

 

संयुक्त अरब अमिरातीच्या रास अल खैमाह येथील किनाऱ्याजवळ हलक्या वजनाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात

 

या विमानाचा सहवैमानिक असलेल्या भारतीय वंशाच्या एका तरुण डॉक्टरसह दोघांचा मृत्यू झाला. रविवारी झालेल्या या अपघातात वैमानिक

 

आणि सहवैमानिक या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती त्या देशाच्या सामान्य हवाई उड्डाण प्राधिकरणाने निवेदनाद्वारे दिली.

सुलेमान अल माजिद हा या विमानाचा सहवैमानिक होता. या अपघातात एका २६ वर्षीय पाकिस्तानी महिलेचाही मृत्यू झाला.

 

संयुक्त अरब अमिरातीमध्येच जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला सुलेमान याने हे विमान आपल्या कुटुंबीयांसह फेरफटका मारण्यासाठी भाड्याने घेतले होते.

 

त्याचे आई-वडील; तसेच लहान भाऊ या वेळी उड्डाण क्लबमध्ये हजर राहून हे उड्डाण बघत होते, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

या विमानाचा रेडिओ संपर्क तुटला आणि त्यानंतर आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

मात्र, विमानातील दोघेही जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती यंत्रणांनी दिली. सुलेमान हा यूकेमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता.

 

गेल्या काही वर्षांपासून तेथे सुलेमान कार्यरत असल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच एक भीषण अपघात झाला होता. त्यात 179 जणांचा मृत्यू झाला होता. दक्षिण कोरियात मोठी विमान अपघात झाला.

 

दक्षिण कोरियात जेजू एअरचे बोईंग 737 हे विमान कोसळले. या भीषण विमान अपघाताचे काही फोटो हे व्हायरल झाले.

 

या फोटोंवरून हे स्पष्ट होतंय की, हा विमान अपघात किती जास्त भयंकर आहे. राष्ट्रीय अग्निशमन संस्थेच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या 179 वर पोहोचली आहे. अनेकजण गंभीर जखमी आहेत.

 

मृतांचा संख्येत वाढ होऊ शकते. या आठवड्यातील ही दुसरी मोठी विमान घटना आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *