पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहात काय ? नितीन गडकरींनी स्पष्ट सांगितलं

Are you in the race for the post of Prime Minister? Nitin Gadkari made it clear.

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान खासदार नितीन गडकरी यांनी पंतप्रधान पदाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

 

तसेच नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांची जोरदार चर्चा असते, यावर देखील त्यांनी भाष्य केले.

 

 

 

 

पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्याशी आपले संबंध कसे आहेत हे त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याच्या शर्यतीत

 

 

 

सामील होण्याच्या अटकळांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले .

 

 

 

 

गडकरींनी फडणवीस यांच्याशी मतभेद असल्याच्या बातम्या फेटाळून लावत ते फडणवीस यांचे गुरू असल्याचे सांगितले.

 

 

 

गडकरी म्हणाले, “फडणवीस यांच्या वडिलांना भेटल्यानंतर मी त्यांच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात केली. एकाच प्रदेशातील दोन मोठे नेते असताना लोक गप्पाटप्पा करतात.

 

 

 

 

मी हस्तक्षेप किंवा तक्रार करत नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही माझा सल्ला घेतात. मी त्यांना सांगतो की, साधक-बाधक विचार करून निर्णय घ्यावा.”

 

 

 

मी कधीच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नव्हतो. आज मी जे काही आहे त्यात समाधानी आहे. मी दृढ विश्वास असलेला भाजपा कार्यकर्ता आहे. मी हिशोब ठेवणारा नेता नाही.

 

 

 

माझा सबका साथ सबका विकासावर विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार प्रशंसनीय काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करू, असा मला विश्वास आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *