नितीश कुमारांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचे खरं कारण

Nitish Kumar told the real reason for going with BJP

 

 

 

 

बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत घरोबा करणार आहेत.

 

 

नितीश यांनी भाजपला पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली आहे. यानंतर नवं सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे.

 

 

नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आज नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली.

 

 

 

आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे, असं नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता. त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.

 

 

 

आम्ही आधीही भाजपबरोबर युती केली होती. ती युती तोडून राजदबरोबर आघाडी बनवली. पण इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं.

 

आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, असंही नितीश कुमार म्हणालेत.

 

 

 

भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नीतीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयू-भाजपचे 3-3 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही शपथविधीला उपस्थित राहू शकतात. नड्डा 3 वाजता पाटण्याला पोहोचत आहेत.

 

 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपालांकडे राजीनामा देऊन सरकार विसर्जित केलं. त्यानंतर रविवारी सायंकाळीच पुन्हा नव्याने शपथ घेतली. अगोदरच्या सरकारमध्ये ते आरजेडीसोबत होते. आता त्यांनी एनडीए अर्थात भाजपसोबत जाणं पसंद केलं आहे.

 

नितीश कुमार सातत्याने पक्षबदल करत असल्याने त्यांना पलटीराम म्हणून हिणवलं जातंय. काँग्रेसला सोबत घेऊन इंडिया आघाडी स्थापन करण्यामध्ये नितीश कुमार यांचा मोलाचा वाटा होता. भाजपला आणि पर्यायाने नरेंद्र मोदींना दूर ठेवत देशातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी नितीश यांची भूमिका होती.

 

 

मात्र नितीश यांनी पुन्हा एकदा भाजपला साथ दिली आहे. सायंकाळी पाच वाजता नितीश यांनी शपथ घेतली असून भाजपच्या दोन आमदारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकूण ८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

 

 

नितीश कुमार यांच्या पलटी राजकारणावर शरद पवार यांनीदेखील भाष्य केलं आहे. पवार म्हणाले की, नितीश कुमारांनी भाजपला सोडत आरजेडीसोबत युती केली होती.

 

 

 

आता त्यांनी पुन्हा आरजेडीला दूर ठेवत भाजपला जवळ केलं आहे. नितीश यांनी रेकॉर्ड केलं आहे. सुरुवातीला त्यांनीच पुढाकार घेत विरोधी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती.

 

 

मात्र त्यांनी आता पुन्हा भूमिकाबदल केल्याचं पवार म्हणाले. शिवाय अशी स्थिती आजवर कधी निर्माण झाली नव्हती, असा टोला त्यांनी लगावला.

 

 

 

अवघ्या काही महिन्यातच ही आघाडीही फुटणार; नितीश कुमारांनी पलटी मारल्यानंतर प्रशांत किशोर यांचा दावा
या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 

 

सम्राट चौधरी (भाजप)

विजय कुमार सिन्हा (भाजप)

डॉ. प्रेम कुमार (भाजप)

विजय कुमार चौधरी (जेडीयू)

 

 

 

बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)

श्रावण कुमार (जेडीयू)

संतोष कुमार सुमन (HAM)

सुमित कुमार सिंग (अपक्ष)

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *