काँग्रेसच्या 5 खासदारांचं निलंबन
Suspension of 5 Congress MPs

नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरुन लोकसभेत घातलेल्या गोंधळामुळं काँग्रेसच्या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करताना सभागृहात असभ्य वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं या अधिवेशनात आता पुढे ते सहभाग घेऊ शकणार नाहीत.
टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभेचं कामकाज सुरु झाल्यानंतर लगेचच विरोधकांनी सभागृहात कालच्या संसदेच्या सुरक्षेत झालेल्या गंभीर चुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला टार्गेट करत गोंधळ घालायला सुरुवात केली.
l
लोकसभेचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, “कालची घटना दुर्देवी होती. पण यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
या प्रकरणात राजकारण होता कामा नये. त्यानंतर राज्यसभेतही गोंधळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.