अजबच … खऱ्याखुऱ्या सोन्याच्या ‘बिया’ असलेले खजूर ,किंमत 13 लाख रुपये;VIDEO

Strange... Dates with real gold 'seeds', worth Rs 13 lakh

 

 

 

‘आसमान से गिरा खजूर में अटका’ हिंदीमधील ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. एखाद्या संकटातून दुसऱ्या संकटात अडकणे असा या म्हणीचा अर्थ आहे.

 

मात्र याच खजूरामुळे एक व्यक्ती अचडणीत सापडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चक्क सोन्याच्या बिया असलेले खजूर ही व्यक्ती भारतात घेऊन येताना तिला अटक करण्यात आली आहे.

माहितीनुसार, नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी ही कारवाई कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केली.

 

विमानतळावरुन होणाऱ्या तस्करीवर नजर ठेऊन असलेल्या कस्टमच्या अधिकाऱ्यांना एका प्रवाशाबद्दल संशय आला. सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेद्दा येथून नवी दिल्लीला आलेल्या एसव्ही 756 या विमानाने ही व्यक्ती भारतात दाखल झाली होती.

 

कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला थांबवून त्याच्याकडील सामान तपासलं. यावेळी त्यांना एक खजूरांची पिशवी सापडली. या पिशवीमधील खजुरं साधी नव्हती.

 

कस्टम अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडील खजूराची पिशवी ताब्यात घेत त्यामधील खजूर ट्रेमध्ये काढून घेतले. त्यापैकी काही खजूर तुलनेनं अधिक जड वाटल्याने ते बाजूला काढण्यात आले.

 

हे खजूर उघडून पाहण्यात आलं असता कस्टमच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. या खजूरांमध्ये अधिकाऱ्यांना सोन्याचे तुकडे आणि सोन्याच्या चैनीचे तुकडे सापडले. कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सगळं सोनं असून त्याचं एकूण वण 172 ग्राम इतकं आहे.

 

म्हणजेच हे 14.75 तोळं सोनं कस्टम अधिकाऱ्यांना सापडलं. आज सोन्याचे दर 88 हजार 115 रुपये प्रती तोळा इतका आहे. या दराने या सोन्याची किंमत 12 लाख 99 हजार 696 रुपये म्हणजेच 13 लाखांच्या आसपास इतकी होते. एएनआयने या खजूरांमधून बियांऐवजी कस्टम अधिकारी सोनं बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

 

या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणात आरोपीला इतर कोणी मदत केली होती का? त्याने यापूर्वी अशाप्रकारे सोनं देण्यात आणलं आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *