महायुतीच्या जागावाटपाचा तिढा “या” १२ जागांमुळे सुटेना

These 12 seats will not solve the rift of Mahayuti's seat distribution

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीत २७६ जागांवर बोलणी पूर्ण झाली आहेत. परंतु अद्याप सुमारे १२ जागांचा प्रश्न सुटलेला नाही.

 

त्यामुळेच अद्याप महायुतीने आपले जागावाटप जाहीर केलेले नाही. दरम्यान, गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुमारे २५ जागांचा वाद मिटल्याची माहिती आहे.

 

उर्वरित जागांपैकी काहींवर भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात रस्सीखेच सुरू आहे, तर काहींवर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार)

 

यांच्यात चर्चा सुरू आहे. याशिवाय ४ ते ५ जागा अशा आहेत ज्यावर भाजप, शिवसेना आणि अजित राष्ट्रवादी तिघांनी दावा केला आहे.

 

पालघर, बोईसर, वसई, नालासोपारा याबाबत भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप एकमत होऊ शकलेले नाही, तर बडगाव शेरी, आष्टी

 

आणि तासगावच्या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत झाले नाही. या जागांसाठीचे उमेदवार परस्पर संमतीने ठरवावेत,

 

उमेदवारांची संख्याबळ आणि त्यांच्या विजयाची प्रबळ शक्यता लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करावेत, अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत.

 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजप सुमारे १५५/१५६ जागांवर, शिवसेना सुमारे ८२/८३ जागांवर

 

आणि राष्ट्रवादी ५०/५१ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, राज्यातील ३१ विधानसभा जागांबाबत महायुती चिंतेत आहे. महायुतीसमोर मराठवाडा,

 

पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई उपनगरच्या जागा आहेत, जिथे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली होती.

 

 

गेल्या विधानसभा (२०१९) च्या आकडेवारीवर नजर टाकली तर, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी ३१ जागा अशा होत्या,

 

जिथे विजय आणि पराभवाचा फरक पाच हजार मतांपेक्षा कमी होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निकराच्या लढतीत या ३१ पैकी महायुतीने १५ तर

 

महाविकास आघाडीने १६ जागा जिंकल्या होत्या. यावेळी विधानसभा निवडणुकीत या जागांवर महायुतीचा आकडा सुधारण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *