अजित पवारांचा नवाब मालिकांना धक्का ;शरद पवारांना सोडून केली मोठी चूक

Ajit Pawar's shock to Nawab series; Big mistake by leaving Sharad Pawar

 

 

 

महायुतीची दिल्लीत बैठक पार पडत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक पार पडली.

 

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता.

 

त्यानुसार त्यांच्या उमेदवारीलादेखील विरोध झाला. त्यामुळे आता नवाब मलिक यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती आहे. ते मानकूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते.

 

पण त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे त्यांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर येथून उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक नेत्यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. नवाब मलिक आणि सना मलिक या दोघांना एबी फॉर्म देण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती.

 

पण नवाब मलिक यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. त्यामुळे अमित शाह यांनी याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले.

 

त्यांच्या निर्देशांनुसार नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नाही. त्यांच्याऐवजी आता कुणाला उमेदवारी दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

 

दरम्यान, भाजपच्या देखील एका नेत्याचं तिकीट कापण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. सोलापूर दक्षिणमधून राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार नाही.

 

स्थानिक राजकारण आणि गटबाजी पाहता राम सातपुते यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी देखील त्यांची चर्चा होती.

 

त्यांना लोकसभेत यश आलं नाही. यानंतर त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं जाईल, अशी चर्चा होती. पण सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांची आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तीनही प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत.

 

महायुतीच्या या प्रमुख नेत्यांची दिल्लीत आज सकाळीदेखील बैठक पार पडली. जवळपास तीन तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतरही 16 ते 18 जागांचा तिढा सुटला नव्हता.

 

त्यामुळे दुपारी पुन्हा बैठक पार पडली. जवळपास दोन तास बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्याबाबतच्या जागांचा पेच सुटला.

 

यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यात चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *