बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी पैसे पुरविणारा गुजराती व्यक्तीला अटक
Gujarati man arrested for providing money for Baba Siddiqui's murder

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांड प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आणखी एकाला अटक केलीय. आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुजरातमधल्या एका आरोपीला महाराष्ट्रातील अकोल्यातून अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय. त्याने इतर आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे.
अकोल्यातील बाळापूर इथून अटक केलेल्या आरोपीचं नाव सलमान इकबाल वोहरा असं आहे. तो गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील पेटलाद इथला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली.
सलमानच्या अटकेबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितंल की, मे महिन्यात एक खातं उघडण्यात आलं होतं. त्या खात्यावरून आरोपी गुरमेल सिंह, रुपेश मोहोल,
हरीशकुमारचा भाऊ नरेशकुमार सिंह यांना पैसे पाठवण्यात आले होते. इतकंच नाही तर वोहराने इतर आरोपींनासुद्धा मदत केली होती.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर घटनास्थळावरून उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना अटक केली होती.
पोलिसांनी नुकतंच या प्रकरणी आणखी एका शूटरला अटकं केलीय. शिवकुमार गौतम असं त्याचं नाव आहे. तो १२ ऑक्टोबरपासून फरार होता.