संजय राऊत यांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Sanjay Raut's serious allegations against the Election Commission

 

 

 

 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक आणि आसपासच्या मतदारसंघात चुरश दिसली.

 

 

 

या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अनेक मंत्री तळ ठोकून होते. तर मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने झाल्याचे खापर संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपवर फोडले. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.

 

 

 

 

सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता.

 

 

 

 

हा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा, उर्वरीत दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदार संघाचा समावेश नाहीये. मात्र त्यानंतर आता सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

 

पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केला. 13 मतदारसंघत भाजप आणि

 

 

 

 

त्यांच्या मित्रपक्षांच्या पराभवाची खात्री झाल्याने त्यांनी मतदार यंत्रणा बिघवडवल्याचा आरोप त्यांनी केला. पण जनतेने चिकाटीने मतदान केले. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

 

 

 

 

मतदान प्रक्रिया मुद्दामहून संथ केल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. मतदान प्रक्रिया संथ झाल्याने जनतेला मतदानासाठी रांगेत कित्येकवेळ उभे राहावे लागले.

 

 

 

लोक कंटाळून निघून जातील, त्यांना मतदान करता येणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा सोमवारी राबविण्यात आल्याची शंका राऊतांनी व्यक्त केली.

 

 

 

 

ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला, महाविकास आघाडीला भरघोस मतदानाची शक्यता होती, त्याच ठिकाणी कासवगतीने यंत्रणा राबविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 

 

 

 

मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याची शक्यता होती मात्र तरी देखील मतदान झाले आहे. मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आले होते.

 

 

 

 

 

एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड कसा आला आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले.

 

 

 

 

 

मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी आणि मिंध्ये गट करत होते. त्यांच्यामध्ये पराभावाची भीती आहे हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनामध्ये आणला आहे.

 

 

 

 

भाजपसह मित्रपक्षांना मते मिळतील, अशा ठिकाणी मतदान यंत्रणा सुरळीत होती. पण महाविकास आघाडीला जादा मतदान मिळत असलेल्या ठिकाणी

 

 

 

 

मतदान यंत्रणा बिघडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर आम्ही जागरुक असल्यानेच त्यांना ईव्हीएम हॅक करता आले नाही, असे ते म्हणाले.

 

 

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक-दीड तासांमध्ये थांबणार असताना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

 

 

 

 

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आणि मोदी सरकारवर घणाघात केला. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा करतोय.

 

 

 

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरे यांनी केला होता . पुढे ते असेही म्हणाले, दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई मतं नोंदवताना केली जात आहे.

 

 

 

मी नागरिकांना आवाहन करतोय, आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. आपण मतदानकेंद्रांमध्ये जावून उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत

 

 

 

 

त्यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सोडू नका. तुमचं मतदान केल्याशिवाय सोडू नका. तुमच्या मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केले होते .

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *