भाजपच्या पहिल्या यादीत 34 मंत्र्यांना उमेदवारी,मात्र नितीन गडकरींचे नाव नाही ;काय कारण?
In BJP's first list of candidates for ministers, but Nitin Gadkari's name is not there; what is the reason?
भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी आज (दि.2) लोकसभेसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 34 मंत्र्यांना
उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र, पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत एकूण 28 महिलांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसणार आहेत.
तर भाजपने हेमा मालिनी यांनाही उमेदवारी घोषित केली आहे. हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निडवणूक लढवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली.
दरम्यान, असे असले तरी नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत
उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
भाजप नेते विनोद तावडे यांनी आज 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन माजी मुख्यमंत्र्याची नावे देखील आहेत. 47 जागांवर युवा उमेदवार देण्यात आलेत.
तर 28 जागांवर अनुसुचित जातींतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवाय 57 जागांवर ओबीसींना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अमित शाह गांधीनगर मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
भाजप नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्रात विधानसभेचं तिकिट नाकारण्यात आले होते. दरम्यान, तेच तावडे आज मोदींसह भाजपच्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहे.
निष्ठावान नेत्यांना संधी दिली जात नाही, या आरोपांना भाजपने यामाध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.