कोरोनामुळे एकाच्या मृत्यूने खळबळ; जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा

Excitement due to the death of one due to Corona; World Health Organization warns India

 

 

 

 

देशात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय. कोरोना व्हायरस आणि त्याच्या संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसून येतंय.

 

 

नुकतंच कोरोनाचा एक नवा उप प्रकार भारतात आढळला होता. या नव्या उप प्रकाराचं नाव JN.1 असं असून याचं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.

 

 

या दोन घटना समोर आल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. यावेळी राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये नियमित व्यायाम म्हणून मॉक ड्रील घेण्यात येणार आहे.

 

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केरळमध्ये कोरोनाच्या भीतीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली असून

 

 

अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आलंय.

 

 

 

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर नगरपालिकेतील प्रभाग-1 निवली या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.

 

 

आता या घटनेनंतर, परिसरात कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर देण्यात येतोय. 80 वर्षाच्या या मृत व्यक्तींला खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

सिंगापूरमधील एका भारतीय व्यक्तीला कोरोनाच्या JN.1 उप-प्रकाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून

 

 

25 ऑक्टोबर रोजी तो सिंगापूरला गेला होता. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तसेच तामिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. मात्र, अशा रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

 

 

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंबंधी इशारा दिला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN1पासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा WHOनं दिला आहे.

 

धक्कादायक म्हणजे केरळच्या त्रिवेंद्रममध्ये JN1 हा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे सर्व राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

कोरोना विषाणूचा आणखी एक नवीन प्रकार भारतात सापडल्याने भारतीय आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. JN.1 चा पहिला पुग्ण आढळला आहे. कोविड-19 चा हा उपप्रकार केरळमध्ये नोंदवला गेला आहे.

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सर्व राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन केले जात आहे.

 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. 8 डिसेंबर रोजी हा नवा व्हेरिएंट आढळला आहे.

 

 

18 नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत 79 वर्षीय महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. महिलेला इन्फ्लूएंझा सारखी आजार (ILI) ची सौम्य लक्षणे होती आणि ती कोविड-19 मधून बरी झाली होती.

 

 

सध्या देशातील कोविड-19 प्रकरणांपैकी 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणे गंभीर नाहीत. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते त्यांच्या घरात एकटे राहत आहेत.

 

 

पुन्हा एकदा कोविडचा धोका वाढल्याने नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्क घालावा तसेच श्वसनासदंर्भात त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *