राज्यात सरसगट १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही,पण सुटीचे दिले “यांना” अधिकार
Generally, there is no holiday for schools on November 18 and 19 in the state, but they are given the right to leave

राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार आहेत. कोणतीही सार्वत्रिक सुटी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे
एकही शिक्षक शालेत उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहे, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.
शिक्षण आयुक्तालयाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
त्यानुसार राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,
त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना देण्याबाबत
असे नमूद करण्यात आले. मात्र, या संदर्भात संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले.
मांढरे दिलेल्या माहितीनुसार १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. शासनाने या संदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत.
१८ आणि १९ रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही
अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.