सत्तेपासून दूर राहिल्यास काय? भाजपचा हा असेल प्लॅन B

What if we stay away from power? This will be BJP's plan B

 

 

 

विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बहुतांश एक्झिट पोलचा कल हा भाजपच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या बाजूने आहे.

 

त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यास सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा राहील,

 

मात्र खबरदारी म्हणून भाजपने प्लॅन बी तयार ठेवला आहे. महायुतीत नसलेल्या अपक्ष आणि लहान सहान घटक पक्षांसोबत बड्या नेत्यांनी बोलणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

महायुतीत नसलेल्या घटक पक्षांसोबत भाजपकडून बोलणी सुरु करण्यात आली आहे. महायुती जर बहुमतापासून दूर राहिली,

 

तर छोट्या घटक पक्षांची मोट बांधण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. महायुतीच्या नेत्यांची अपक्ष आणि छोट्या पक्षांसोबत बातचित सुरु झाली आहे.

सत्तेत वाटा देऊन अशा अपक्ष आणि लहान घटकपक्षांना सरकारसोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न असेल. बहुतांश एक्झिट पोल बाजूने असले,

 

तरी भाजप सतर्क राहून यावेळी सावध पावलं टाकणार आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी,

 

बच्चू कडू यांची प्रहार संघटना यांच्याशी बोलणी होण्याची शक्यता आहे. आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपकडून हरतऱ्हेचे प्रयत्न केले जाऊ शकतात.

 

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही सत्तेसोबत राहण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्ष किंवा युतीला पाठिंबा देण्यासाठी

 

जर उद्या वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाले, तर आम्ही सरकार स्थापन करु शकणाऱ्या पक्ष किंवा युतीसोबत राहणे पसंत करु, अशी भूमिका ‘एक्स’ सोशल मीडियावरुन ट्विट करत आंबेडकरांनी व्यक्त केली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *