बच्चू कडूंना आघाडी,युती दोघांचेही फोन ,पडद्यामागे होतायेत गुप्त हालचाली

Bachchu Kadu gets calls from both the alliance and the alliance, secret activities are going on behind the scenes

 

 

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल.

 

या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आणि महाविकस आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे.

 

असे असताना राज्याच्या राजकारणातील इतर लहान पक्षांना आपल्या कडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याची चर्चा होत असताना बच्चू कडू यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

 

परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती पुढे आली आहे.

 

बच्चू कडू यांनी स्वत: फोनद्वारे या बाबत माहिती दिली आहे. उद्या निकाल लागल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याचं ही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

 

बच्चू कडू हे सध्या मुंबईतच आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात आणि ते मविआ की महायुतीची साथ देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि

 

राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं आहे. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-17 फॉर्मवरील माहिती काय होती

 

आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

 

या बैठकीत महाविकास आघाडी 157 जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे.

 

या बैठकीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी? यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *