कराडच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल

Police efficiency questioned after Karad surrender

 

 

 

वाल्मिकी कराड अखेर शरण आला आहे, त्याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्कारली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर आरोप करण्यात येत होते.

 

हत्येच्या घटनेनंतर 22 दिवसांनी वाल्मिकी कराड याने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकारणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. दाते पंचांग बघून आज कराडने आत्मसमर्पणे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

‘दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते.

 

पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.’ असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

 

दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार, आम्ही कोणालाही सोडणार नाही.

 

हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दोषींवर कारवाई होणार, मात्र ज्यांना -ज्यांना यामध्ये राजकारण वाटत असेल त्यांना ते लखलाभ, माझं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी फोनवर बोलणं झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

वाल्मिकी कराडवर संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप करण्यात येत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने आज पुण्यात शरणागती पत्कारली, तो सीआयडीला शरण आला आहे.

 

वाल्मिकी कराड याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. तो पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतरही विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरूच आहे.

 

संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये मोर्चा झाला, हे सीआयडीचं यश नसून, आम्ही सरकारवर जो दबाव टाकला त्यातून वाल्मिकी कराडवर मानसिक दबाव आला

 

आणि तो शरण आला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 22 दिवस वाल्मिकी कराड हा महाराष्ट्रात बिनधास्तपणे फिरत होता.

 

त्याने अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतलं. तो पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाला. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मिकी कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

वाल्मिकी कराड हा 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने १४ गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा तो बॉडीगार्ड घेऊन फिरतो. कराडवर मोक्का लागणे गरजेचे आहे.

 

मुख्यमंत्री यांनी आता वाल्मिकी कराड याच्यावर मोक्का लावणार की नाही याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.वाल्मिकी कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद देऊ नये. कुणीही पालकमंत्री पद घ्याव पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये,

 

मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही

 

आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही , मोठ मन करून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, जोपर्यंत न्याय मिळत नाही,

 

तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मगाणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही का बोलला नाहीत? असंही यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *