EVM घोटाळ्याबाबत काय म्हणाले अजित पवार ?

What did Ajit Pawar say about the EVM scam?

 

 

 

‘महायुती’ला बहुमत मिळाले म्हणून विरोधकांनी मतयंत्रावर (ईव्हीएम) खापर पडू नये. छत्तीसगडमध्ये यांचे सरकार निवडून आल्यावर आणि लोकसभेला आमच्या झालेल्या पराभवावेळी मतयंत्रात घोटाळा झाला नाही का?

 

असा सवाल करून, लोकसभेच्या पराभवातून धडा घेत आम्ही काम केले. जनतेपर्यंत अनेक योजना पोहोचवल्या. त्यामुळे हे यश मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराडमध्ये आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार मकरंद पाटील, हसन मुश्रीफ उपस्थित होते. अजित पवार म्हणाले,

 

महाराष्ट्राच्या कृषी, औद्योगिक प्रगतीचा पाया रचणाऱ्या यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आणि चव्हाणसाहेबांनी घालून दिलेल्या वाटेने आम्ही व सर्वांनी वाटचाल करणे हीच यशवंतरावांना खरी श्रध्दांजली ठरेल.

 

मुख्यमंत्रिपदासाठी तुमचेही नाव चर्चेत असल्याचे विचारले असता, अजित पवार म्हणाले, ‘महायुती’चे मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणतेच सूत्र (फॉर्म्युला) अजून तरी ठरलेले नाही.

 

त्यासंदर्भात आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेसने माझी नेतेपदी तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाली आहे. भाजप त्यांच्या नेतेपदाची निवड करतील.

 

आम्ही तिघेही पक्षनेते एकत्र बसू, आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. राज्याला मजबूत, स्थिर सरकार देऊ असा विश्वास अजित पवार यांनी दिला. राज्याच्या तिजोरीचा विचार करून आम्ही योजना जाहीर केल्या व त्याचा लाभही दिल्याचे त्यांनी ठळकपणे नमूद केले.

 

बारामतीतील लढतीबाबत ते म्हणाले, युगेंद्र हा व्यावसायिक असून, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. लोकसभेला माझी चूक झाली, हे मी सर्वांना सांगून दमलो.

 

तरीही माझ्या सख्ख्या पुतण्याला माझ्या विरोधात उभे करायचे काहीच कारण नव्हते, माझी चूक झाली, म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा काय? असा सवाल त्यांनी शरद पवारांना निक्षून केला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची स्थिती नाही. आजच घटक पक्षांचे तिघे आम्ही एकत्र बसून स्थिर सरकार देऊ, आमच्याकडे बहुमत आहे, विरोधी पक्ष नेता होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही.

 

मात्र, विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू, त्यांचे रास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काम करणार आहोत.

 

राज्य सर्व क्षेत्रावर आघाडीवर कसे राहील, ही परंपरा कायम ठेवण्यासाठी कमी पडणार नसल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *